बंगळुरूच्या कब्बन पार्कमध्ये एका कंपनीने चक्क झाडांना मिठी मारण्यासाठी १५,०० रुपये शुल्क आकारल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. होय हे खरे आहे. ट्रोव्ह एक्सपिरियन्सने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर “फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियंस” नावाने ही “वन्य उपचार शक्ती” (“The Healing Power of Forests”) ची सुविधा दिली जात असल्याचे सांगितले आहे. ज्यासाठी कंपनी १५०० रुपये शुल्क आकारत आहे. एका एक्स युर्जरने या ही माहिती दर्शवणारा स्क्रिनशॉट शेअर केला आहे आणि हा अनुभव एक फसवणूकीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

ट्रोव्ह एक्सपिरियन्सने त्यांच्या वेबसाइटवर स्पष्ट केल्याप्रमाणे “फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियन्स”मध्ये ‘झाडांना मिठी मारणे’ व्यतिरिक्त अनेक सुविधांचा समावेश केला आहे. पण नेटकऱ्यांचे मत आहे की, ही सुविधा एका फसवणूकीचा प्रकार आहे. व्हायरल पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लोकांनो जागे व्हा! बाजारात एक नवीन स्कॅम सुरू झाला आहे,”

हेही वाचा – पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral

कंपनीच्या वेबसाईटवरील या जाहिरातीमध्ये शिनरीन योकू किंवा फॉरेस्ट बाथिंग या जपानी कलेने प्रेरित होऊन वनात फिरण्याची संधी देत असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या वेबसाइटने या उपक्रमाचे वर्णन शांत जंगलात भेट म्हणून केले आहे,जी निसर्गाशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि मनःशांती मिळवण्याची संधी देते.

“शहरातील आपले दैनंदिन जीवन खूप तणावपूर्ण असू शकते आणि निसर्गाशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी एक ठराविक वेळ आणि जागा शोधणे, सर्व गोंगाटापासून मुक्त, तुमचा स्वतःचा आवाज ऐकणे हे एक आव्हान असू शकते. शिनरीन योकू, किंवा फॉरेस्ट बाथिंगची जपानी कला, जंगलाच्या शांततेमध्ये हरवून जाण्याचा अनोखा अनुभव देते जे तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतो ,” असे वेबसाइटवरील उपक्रमांच्या वर्णनामध्ये सांगितले आहे.

त्यात असेही म्हटले आहे की, “या अनुभवामध्ये निसर्गाशी संबंधित हितकारक उपक्रमांसह मार्गदर्शन केलेल्या जंगल सफारीचा समावेश असेल.”

२८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १०:३० या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, एका सहभागीसाठी एक तिकीट वैध आहे.

हेही वाचा – तुम्ही खाऊ शकता का हा निळ्या रंगाचा भात? Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

येथे वेबसाइट पहा:

ट्रोव्ह एक्सपिरियन्सच्या अधिकृत वेबसाइटवर “फॉरेस्ट बाथिंग एक्सपीरियंस” ची सेवा दर्शवणारी जाहिरात (सौजन्य – एक्स AJayAWhy)

ऑनलाइन पोस्ट केल्यापासून, पोस्टला लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. “उच्च न्यायालयाच्या अगदी मागे हे घडत आहे, असे एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे,

“आठवड्यातील ५ तास काम करताना ते ९५ टक्के भारतीयांपेक्षा चांगले जगत आहेत असे वाटणाऱ्या या बेंगळुरूमधील तंत्रज्ञानातील लोकांना अपराधी भावनेने ग्रासले आहेत, त्यांना स्वत: बद्दल चांगले वाटावे म्हणून अध्यात्माकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असे एकाने मत व्यक्त केले. “या लोकांना सर्व रंगीबेरंगी आणि संभाव्य मार्गांनी मूर्ख बनवले जाऊ शकते,” असे दुसरी व्यक्ती म्हणाली.

“रु. १५०० जास्त नाहीत. मी एकदा हे ट्राय करून पाहू शकतो हे मजेदार वाटते,” असे म्हणत एकाने उपक्रमात सहभागी आवड व्यक्त केली.

जाहिरातीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (सौजन्य – एक्स AJayAWhy)

ही पोस्ट २ लाखांहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाली आहे.