Viral Video: यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. अनेक उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परीक्षेत खूप मेहनत घेतात. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते जिद्द, मेहनतीसह सतत सराव करतात आणि त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल आज मंगळवारी १६ एप्रिल रोजी जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूपीएससीच्या संकेतस्थळावर निवड झालेल्या एक हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये आदित्य श्रीवास्तव याने भारतात पहिला क्रमांक पटकवला आहे, हा लखनऊचा रहिवासी आहे; तर सोशल मीडियावर यूपीएससी नागरी सेवा टॉपर आदित्य श्रीवास्तववर शुभेच्छांचा व प्रेमाचा वर्षाव होत आहे. अशातच त्याच्या मित्रांनी खास पद्धतीत या निकालाचं सेलिब्रेशन केलं आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…कर्करोगाशी लढण्याचं बळ देणाऱ्या ‘या’ तपासणी केंद्राचं आनंद महिंद्रानी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्हाला सलाम…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत आदित्य श्रीवास्तव कॅमेराकडे बघून हसत आहे. नंतर त्याचे मित्र येतात आणि त्याचे अभिनंदन करू लागतात. पण, जसा जसा व्हिडीओ पुढे जातो, तसं सगळे मित्र त्याला उचलून घेतात आणि जोरजोरात त्याच्या नावाचा जयघोष करू लागतात व त्याला पूर्ण कॅम्पसमध्ये घेऊन फिरवून आणतात आणि असे हटके सेलिब्रेशन करतात; हे पाहून आदित्य श्रीवास्तवच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @UPSC Notes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आयएएस टॉपर AIR-1 आदित्य श्रीवास्तव मान गए सेठ जी”; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आदित्य श्रीवास्तववर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc civil services topper aditya srivastava video shows his first reaction how his friends celebrated his success asp
Show comments