Leopard Yoga Video: सूर्यनमस्कार हा एक असा व्यायाम आहे जो आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतो. जगभरातील लाखो लोकांनी व्यायामाचा हा प्रकार आपल्या व्यायामाचा नियमित भाग बनवला आहे. तुम्हीही अनेक कलाकारांना इंस्टाग्राम, ट्विटरवर सूर्यनमस्कार करतानाचे व्हिडीओ शेअर करताना पाहिले असेल. पण आता सांगा, तुम्ही कधी बिबट्याला ‘सूर्य नमस्कार’ करताना पाहिले आहे का? अलीकडेच, भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी बिबट्याने योगा केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
“बिबट्याने केलेले सूर्यनमस्कार” असे कॅप्शन देत नंदा यांनी पोस्ट शेअर केली आहे. क्लिपमध्ये, आपण पाहू शकता की एका टेकडीजवळ एक बिबट्या उभा आहे. हा बिबट्या आपले शरीर ताणून सूर्यनमस्कार करत असल्याचा भास होतो. हा व्हिडिओ मूळतः IFS साकेत बडोला यांनी शेअर केला होता आणि सुसंता नंदा यांनी ट्विटरवर पुन्हा शेअर केला आहे.
बिबट्याचा सूर्यनमस्कार Video
हे ही वाचा<< पाण्याविना वापरायचं टॉयलेट बनवून महिलेने केला भलताच जुगाड! Video मध्ये बघा विष्ठेची राख कशी होते?
हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. यावर ३२०० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्सही आहेत. अनेकांनी आता प्राणी पण आम्हाला व्यायाम न करण्यावरून चिडवत आहेत असे म्हणत कमेंट केली आहे. तर काहींनी बस्स खूप झालं आता आम्ही पण पोट कमी करून व्यायामाला लागणार असे प्रण घेतले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा!