रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून थोडासा आराम मिळवा; ट्रॅफिकच्या आवाजपासून कानांना आणि मनाला शांतता मिळावी, म्हणून आपण ट्रीप किंवा पिकनिकसाठी एखाद्या सुंदर अशा, निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या हॉटेलमध्ये राहायला जागा बुक करतो. जितके दिवस तुम्ही तिथे असता तोपर्यंत, तुम्हाला सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. वेगवेगळे वन्यप्राणी तुमच्या खोलीच्या खिडकीजवळ येऊन, भेट देऊन तुमची सकाळ प्रसन्न करून जातात. मात्र निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला सर्वाधिक काळजी घ्यावी लागते ती माकडांची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिथे गर्द झाडी असते तिथे माकड, वानर, हुप्या हमखास दिसतात. ते कधी आपल्यावर हल्ला करतील किंवा आपल्या खोलीत शिरतील यांचा नेम नसतो. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सध्या अशाच एक विशिष्ट प्रकारच्या माकडाने खोलीचा ताबा घेतला असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. @walenyc या अकाऊंटवरून शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे पाहू.

हेही वाचा : Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

तर व्हिडिओचया सुरवातीला एक केशरी रंगाचे केस असलेले एक ‘ओरँगउटांग’ माकड आपल्या पिल्लाला पोटाजवळ धरून खोलीच्या दारात बसलेले पाहायला मिळते. त्या दृश्यांच्यासोबतीने व्हिडिओ बनवणारी व्यक्ती माकड घरात कधी आले ते सांगतो. “आम्ही आत्ता नुकतेच झोपेतून उठलो आणि आम्हाला समोर हे ओरँगउटांग माकड दिसले” असे व्हिडिओमध्ये आपल्याला मिळते आहे. त्यानंतर ते माकड चालत-चालत खोलीमधील बाथरूममध्ये पोहोचते.

गंमत म्हणजे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता ते माकड बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीतील पाण्याने आणि साबणाने आपले हात बराच वेळ धुवून घेतो. माकड आपले हात धुवत आहे, हे दृश्य पाहून त्यावर व्हिडिओ शूट करत असणाऱ्या व्यक्तीला अजिबात विश्वास बसत नाहीये असे त्याच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येते. हात दोन्ही बाजूंनी साबणाने स्वच्छ धुवून झाल्यावर ते माकड बाथरूममध्ये काय-काय ठेवले आहे ते पहाटे. तेव्हा बाथरूम नेमके कसे दिसते हे घर पाहायला आलेली वक्ती ज्या पद्धतीने पाहिलं अगदी तसाच त्या माकडाचा आवेश होता.

व्हिडिओमध्ये पुढे आपल्या हे माकड, शितपेय ठेवलेल्या फ्रीजमधून ३ शीतपेयाच्या बाटल्या घेऊन एका काट्यावर जाऊन बसलेले दिसते. आत त्या माकडाच्या कमरेवर एक पिल्लू, एक शीतपेयची बाटली हातात आणि दोन पायांमध्ये ठेवून ते माकड तोंडाने हातातल्या बाटलीचे झाकण उघडून त्यामधील पेय पिते. असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.

हेही वाचा : Video : “उन्हाळ्याच्या शुभेच्छा” देणारा चिमुकला शुभेच्छुक! बोलण्याची शैली ऐकून पोट धरून हसाल…

घडणाऱ्या या संपूर्ण घटनेवर व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा तो काय दृश्य पहात आहे यावर विश्वासच बसत नसल्याचे त्याच्या एकंदरीत बोलण्यातून लक्षात येते. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकरी यावर कय म्हणत आहेत ते पाहू.

“अहो ते माकड त्या घराचा मालक आहे” असे एकाने गंमतीने लिहिले आहे. “या व्हिडीओमध्ये फक्त एकच हुशार प्राणी पाहायला मिळतो आहे” असे दुसऱ्याने लिहिले. “ओरँगउटांग खरंच अत्यंत हुशार आणि सुंदर प्राणी आहे. आपलं भाग्य आहे कि ते अजून नामशेष झाले नाहीत.” असे तिसऱ्याने म्हंटले आहे. “हे त्या माकडाने आधीही केलेलं दिसतंय” असे चौथ्याने म्हंटले.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापयर्यंत ३.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of orangutan visiting a house washing hands while carrying baby monkey went viral dha
First published on: 22-03-2024 at 11:15 IST