‘संध्याकाळी काय करायचं?’ असा मित्र-मैत्रिणींनी प्रश्न विचारला की, ‘आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊ पाणीपुरी खायला’ असे उत्तर हमखास मिळते. कुरकुरीत पुऱ्यांमध्ये गरमागरम रगडा, हिरवेगार मिरची-पुदिन्याचे पाणी, चिंचेची थोडी आंबट-गोड अशी चटणी घातलेली, भन्नाट चवीच्या पाणीपुरीची पहिली पुरी खाल्ली की मनाला जो आनंद होतो, तो सांगता येत नाही. अशी पाणीपुरी खाताना प्रत्येक पाणीपुरीप्रेमींची भावना असते. मग त्यामध्ये काही ‘भैया और तिखा बनाओ” म्हणत फक्त तिखट पाणीपुरी खातात, तर काहींना आंबट-गोड चवदेखील आवडते म्हणून ‘मीडियम’ पाणीपुरी खातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, सध्या सोशल मीडियावर ‘फ्यूजन फूड’चा ट्रेंड वाढत आहे. तसेच सर्व पदार्थांना पौष्टिक कसे बनवता येऊ शकते, याकडे अनेक जण लक्ष देतात. यातच सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील ‘रेनबो पाणीपुरी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही ‘सिक्स फ्लेव्हर पाणीपुरी’ याबद्दल ऐकले असेल आणि खाल्लीसुद्धा असेल. यामध्ये वेगवेगळ्या चवीच्या पाण्याचा [लसूण, पुदिना, जलजिरा इत्यादी] वापर करण्यात येतो. मात्र, या रेनबो पाणीपुरीमध्ये पुरीपासून ते पाण्यापर्यंत सर्वांमध्ये भाज्यांचा रस आणि हळद यांचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा : अरे देवा! ‘हा’ पदार्थ घालून बनवली पाणीपुरी! पाणीपुरीप्रेमींनो, व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिलात का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @wander_eater_ नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहू. त्यानुसार पाणीपुरीच्या पुऱ्या या पिवळ्या, काळ्या आणि गुलाबी रंगाच्या असल्याचे आपल्याला दिसते. हे रंग येण्यासाठी गुलाबी रंगाच्या पुऱ्या बीटापासून, काळ्या रंगाच्या पुऱ्या जांभळापासून आणि पिवळ्या रंगाच्या पुऱ्या या हळदीचा वापर करून बनवल्या आहेत. तसेच हिरव्या पाण्यासाठी पालक आणि पुदिन्याचा वापर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला, “या पुऱ्यांमध्ये, पाण्यामध्ये कोणत्याही खायच्या रंगाचा वापर केलेला नसून, केवळ भाज्यांचा रस करून आणि पुदिना आणि पालक वापरून तयार केले आहे”, अशी माहिती देते. तसेच व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननुसार या पाणीपुरीची किंमत ही २० रुपये आहे असे समजते.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूया :

“खूप भन्नाट कल्पना आहे!” असे एकाने लिहिले आहे. “पाणीपुरीबरोबर असे प्रयोग नका करू..” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “नको मी आपली नेहमीची पाणीपुरी खाईन” असे म्हटले आहे.

हेही वाचा : पिझ्झाचे आगळेवेगळे Fusion पाहिलेत का? रेसिपी अन् प्रमाण पाहून घरी बनवा हा ‘पिझ्झा पराठा’….

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @wander_eater_ या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ६.४ इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rainbow pani puri from gujarat went viral on social media mix reaction of netizens dha
Show comments