Viral video: असं म्हणतात सुख कधी विकत घेता येऊ शकत नाही. माणसाचं सुखी असणं हे सर्वस्वी त्यावर अवलंबून असते. काहीवेळा नवी कोरी मर्सिडीज घेऊनही माणसं सुखी नसतात पण सेंकड हँड सायकल विकत घेतल्यावर काही माणसांचा आनंद गगनात मावेनासा होतो. काही आपल्या छोट्या छोट्या कृतीतून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

काही माणसांची स्वप्न मोठी असतात मोठ्या गोष्टी घडल्यानंतरच या लोकांना आनंद होतो. तर काहींना छोट्या गोष्टींचा देखील खूप आनंद होतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घराबाहेर रस्त्याचं खोदकाम सुरु असताना जेसीबीद्वारे माती काढण्याचं काम सुरु असतं. यावेळी हे पाहून एक चिमुकला त्याचाही छोटा ट्रक घेऊन रस्त्यावर येतो. आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा ट्रक देऊन माती काढायला सांगतो. त्यावेळी त्याची आई येते आणि त्याला तिथून मागे उभं करते. मात्र चिमुकल्याचा हा निरगसपणा पाहून कर्मचारीही आनंदी होतात आणि ते चिमुकल्याच्या छोट्याश्या ट्रकमध्ये मोठ्या जेसीबीमधून माती टाकतात. हे पाहून चिमुकला इतका खूश होतो की त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. मुलगा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “एकदा निवडून येऊद्या मग…” ट्रकच्या मागे शायरी लिहत दिलं आश्वासन; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

व्हिडीवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी व्हिडीओला कमेंट करुन त्या मुलाचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं, “सुंदर” तर दुसरा म्हणाला, ‘मला देखील गाड्यांची आवड होती. तिच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत.’ तर एक युझर म्हणाला, ‘आनंदाची किंमत नसते.’ लाखो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.