scorecardresearch

VIRAL VIDEO : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्की येईल. माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ असून इवल्याश्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्ही त्याला एकदा तरी सलाम कराल. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Kid-Viral-Video
(Photo: Twitter/ AwanishSharan )

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे डोळ्यात पाणी आणणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अगदी तसाच आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्की येईल. माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ असून इवल्याश्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्ही त्याला एकदा तरी सलाम कराल. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महान मुलगा आपल्या इवल्या इवल्या हातात थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन येताना दिसून येत आहे. या पाण्याच्या बाटल्या तो फुटपाथवर फुलांची विक्री करत असलेल्या एका महिलेच्या बाजुला ठेवताना दिसून येतो. यातली एक एक थंड पाण्याची बॉटल काढून तो कडक उन्हाच्या झळा सोसत फुटपाथवर बसलेल्या विक्रेत्यांना देताना दिसून येतो. कडाक्याच्या उन्हात काही लोक रस्त्याच्या कडेला बसून पोटापाण्यासाठी काही वस्तूंची विक्री करत असतात. अशा लोकांना कडक उन्हात थंडावा मिळावा म्हणून या मुलाने एक मदतीचा हात पुढे केलाय. त्या मुलाने रस्त्याच्या कडेला उन्हात बसलेल्या लोकांना थंड पाण्याची बाटल्या वाटल्या. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक या चिमुकल्याच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : एकट्या जिराफाची शिकार करायला आले तब्बल ६ सिंह, लढाईत कोण जिंकलं, पाहा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर या चिमुकला बराच चर्चेत आलाय.अयान असं या चिमुकल्याचं नाव असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. लोक या मुलाच्या औदार्याबद्दल कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तुमचा इतकासा दयाळूपणा एखाद्याचा दिवस खास बनवू शकतो.’ हा हृदयस्पर्शी व्हिडीओ अनेकांच्या हृदयाला भिडला.

आणखी वाचा : राणू मंडलनंतर आता ट्रक ड्रायव्हरच्या गाण्याचा VIDEO VIRAL, मोहम्मद रफीच्या गाण्याने लोकांची मने जिंकली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुलाचे हात-पायांना धरून जबरदस्ती शाळेत घेऊन आली आई, हा VIRAL VIDEO पाहून अनेकांना लहानपणीचे दिवस आठवले

मुलाचा दयाळूपणा पाहून लोकांनी त्याची खूप प्रशंसा केली. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर रस्त्यावर गरीब लोकांना मदतीचं आवाहन केलंय. एका यूजरने लिहिले की, ‘सर्वात मोठ्या हेतूपेक्षा दयाळूपणाची छोटीशी कृती अधिक मोलाची असते.’ सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video kid did a heart touching work in hot summer prp

ताज्या बातम्या