Pakistani Women Viral Video: आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस आणखी बिघडली जात आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्यामुळे नागरिकांची चिंता वाढलीय. पाकिस्तानमध्ये अन्न, पेये आणि वाहतुकीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्याने या महागाईने प्रत्येक घराचे बजेट बिघडले आहे. पण, एवढ्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ पाकिस्तानचा नसून इंग्लंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडीओ दोन तरुणींशी संबंधित आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानमधील दोन तरुणी इंग्लंडमध्ये चोरी करताना पकडल्या गेल्या आहेत. व्हायरल व्हिडीओनुसार, दोन्ही मुली एका दुकानातून कबाब चोरून पळून जात होत्या, त्यानंतर त्या दुसऱ्या दुकानात शिरल्या. मात्र, दुकान मालकाला संशय आल्याने त्यांनी दुकानाला कुलूप लावले. यानंतर दोन्ही मुली दुकानात आरडाओरडा करु लागल्या.

(हे ही वाचा : इतका अभ्यासू मुलगा कुठेच सापडणार नाही! होमवर्क करायचा राहिल्यामुळे बहाद्दरानं केलं असं काही की…; आता तुम्हीच पाहा Video )

या दोन मुलींना दुकानात कोंडून दुकान मालकाने दुकानाला कुलूप लावलेले दिसत आहे. त्या मुली बाहेर पडण्यासाठी जोरजोरात ओरडू लागल्या, जेणेकरून बाहेरील लोक त्यांची मदत करतील. त्या पोलिसांना बोलवा अशाही म्हणू लागल्या. परंतु, दुकान मालकाने आणि बाहेरच्या लोकांनीही त्यांचे काहीही ऐकले नाही. बाहेर असलेले काही लोक त्यांचे असे कृत्य पाहून व्हिडीओ बनवत होते. हा व्हिडीओ लंडनचा असून त्यात दिसत असलेल्या मुली पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी मुलींचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, “ते पाकिस्तानचे आहेत त्यामुळे चोरी करणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही.” दुसऱ्याने लिहिले की, “सुंदर मुली कबाब का चोरत आहेत? त्यांना शोभत नाही.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिले की, “दुकानदार खूप हुशार निघाला आणि त्यांनी मुलींना दुकानातच बंद केले, यामुळे त्या पळून जाऊ शकत नाही.”