Viral Video: लग्न म्हटलं की, मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. त्याशिवाय लग्नात काय काय नवीन पाहायला मिळेल, हेदेखील सांगता येत नाही. लग्नात अनेकदा नवरदेवापेक्षा त्याचे मित्रच जास्त उत्साही असतात. अनेकदा हे मित्र आपल्या नवरदेव मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर कशी मजा घेता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. असाच एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीदेखील मनमुराद हसाल.

सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ आपल्या नजरेज पडतात; ज्यात अनेकदा नवऱ्याचे मित्र हटके गिफ्ट देताना आणि लग्न सुरू असताना विचित्र विनोद करताना दिसतात. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर नवरदेवाचे मित्र नवऱ्यासोबत मंडपात ल्युडो खेळताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मित्रांनी नवऱ्याला त्याच्या गाडीसकट उचलून घेतलेले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, भरमंडपात एन्ट्री घेताना नवरदेव बाईकवर बसला असून, ती बाईक चक्क त्याच्या मित्रांनी उचलून घेतली आहे. पुढे हा धिंगाणा इथेच थांबला नाही, तर त्याच्या मित्रांनी नवरदेवाला बाईकवर बसवून नाचवलं. यावेळी तो नवरदेवदेखील मजा घेत होता. बराच वेळ हा बाईक डान्स सुरू होता. यावेळी लग्नात उपस्थित वऱ्हाडीदेखील या सगळ्याचा आनंद घेत होते. हा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘अब तुम ही हो’ गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘आमच्यावेळी शिक्षिका…’

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_johar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “बहुतेक ही बाईक हुंडा म्हणून मिळाली आहे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “आता हेच बघायचं बाकी होतं”. तर आणखी एकानं लिहिलंय, “हर एक दोस्त कमीना होता है”, तर आणखी एकानं लिहिलंय, “आता घोड्याची जागा बाईकनं घेतली”.

दरम्यान, याआधीदेखील एका नवरदेवाची जबरदस्त एन्ट्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यात नवरा बैलगाडीद्वारे लग्नात एन्ट्री घेताना दिसला होता. या व्हिडीओला युजर्सनी पसंती दिली होती.