Viral video: गिनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. विविध प्रकारच्या कला सादर करत किंवा साहस करत अनेक जण विक्रम करतात आणि मग गिनिज बुक त्यांची नोंद घेते. काही जण एखादी वस्तूची सर्वात छोटी प्रतिकृती बनवितात. तर काही जण सर्वात जास्त नखे वाढवून किंवा नखे वाढवून विक्रम करतात, तर काही जण नाकाने वेगाने टायपिंग करतात. नुकताच एका व्यक्तीने असाच एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या तरुणानं एक विचित्र स्टंट करत आपलं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवलं आहे. हा स्टंट पाहून बघणाऱ्यांनाही घाम फुटलाय.

विश्वविक्रम कोणताही असो त्यास प्राप्त करणे अवघड जबाबदारी असते. काही जण जागतिक विक्रम करण्यासाठी कोणतेही दिव्य करण्यासाठी तयार असतात.

मुहम्मद रशीद नावाच्या या व्यक्तीने कुशलतेने बॉटलची झाकणे उघडत विक्रम केला आहे. आपल्या हाताने नाही तर डोक्याने बॉटलची झाकणे उघडली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्डच्या मंचावर त्याने हा स्टंट सादर केला. या तरुणाने आवघ्या १ मिनिटात तब्बल ७७ बॉटलचे झाकण उघडले आहे. त्याला मदत म्हणून दोन तरुण त्याला बॉटल देत आहेत. राशिदने फेब्रुवारी २०२३ मध्ये एका मिनिटात ७७ बाटलीच्या टोप्या काढण्याचा विक्रम केला होता. हा व्हिडीओ बघतानाही अंगावर काटा येतो. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कर्तव्य प्रथम! एवढ्या बर्फातही आरोग्य सेविका १५ किलोमीटर चालत जाते; VIDEO पाहून कराल सलाम

@guinnessworldrecords या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्यात. सोशल मिडीयावर लोक त्यांचे कौतूक करीत आहेत. तसेच लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकानं म्हटलं आहे “वेदनादायक दिसत आहे.”