Premium

‘आयुष्यात काही घडतच नाहीये’ वाटत असेल तर भेळपुरीवाल्या काकांचा ‘हा’ Savage Video बघाच! हसून व्हाल हैराण

Viral Video Today: भारतात दर दुसऱ्या गल्लीच्या तोंडाशी तुम्हाला बोलकी माणसं भेटू शकतात पण त्यातील काही जण तुमची दृष्टीच बदलून टाकतात हे या काकांना बघून वाटलं असं म्हणत नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलेला हा माणूस आहे तरी कोण आणि त्याने नेमकी काय कमाल केलीये बघा..

Why You should Eat Street Food Delhi Bhelpuri Stall Owner LMAO Moments Captured Destroys Kapil Sharma In One Minute Video
स्ट्रीट फूडमध्ये चवच नाही जगण्याची उमेदही मिळते (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bhelpuri Wala Viral Video: “जग बघायचं असेल तर जगता आलं पाहिजे आणि जगायचं असेल तर हसता आलं पाहिजे” या न्यायाने जगणारा एक भेळपुरी वाला सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडीओ तुम्हाला कित्येक महिन्याच्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम करू शकतो. विशेष म्हणजे कोणताही बडेजाव न करता, उगाच अलंकारांनी अर्थाला झाकून न टाकता या भेळपुरी वाल्या काकांनी हसवत- मस्करी करत इतका मोलाचा संदेश दिलाय की त्यांच्या या खेळकर स्वभावाचे लोक चाहते झाले आहेत. भारतात दर दुसऱ्या गल्लीच्या तोंडाशी तुम्हाला बोलकी माणसं भेटू शकतात पण त्यातील काही जण तुमची दृष्टीच बदलून टाकतात हे या काकांना बघून वाटलं असं म्हणत नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलेला हा माणूस आहे तरी कोण आणि त्याने नेमकी काय कमाल केलीये बघा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या रस्त्यावरील भेळपुरीच्या गाडीवर चटकदार, चमचमीत गप्पा मारणाऱ्या या काकांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. एक तरुणी यामध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना दिसते. यापूर्वी सुद्धा काही फूड ब्लॉगर्सच्या व्हिडीओजमध्ये हे बोलके काका दिसले असणार त्यामुळे ओळखीचा चेहरा असल्याप्रमाणे ही व्हिडीओग्राफर त्यांना प्रश्न विचारू लागते. प्रत्येक प्रश्नावर सिक्सर मारत ते भन्नाट उत्तर देतात. त्यांची मजेशीर उत्तरं ऐकून ही तरुणी त्यांना तुम्ही तर कपिल शर्माला सुद्धा मागे टाकाल असं म्हणते ज्यावर ते म्हणतात की, “कपिल शर्माला कॉमेडीचा शब्द पण येत नाही तोफक्त दुसऱ्याचा अपमान करू शकतो. तुम्हाला कोणालाही हसवण्यासाठी कोणा दुसऱ्याचा अपमान करण्याची गरजच नसायला हवी.” स्वतःच्या बायकोच्या हातात सगळी कमाई देणारे हे काका तिच्याविषयी भीती आहे म्हणताना पण प्रेमाने टिंगल करताना दिसतात,

ही चर्चा सुरु असताना शेवटी ही तरुणी त्यांना तुमच्या या मस्तमौला स्वभावाचं रहस्य तरी काय हे विचारते. ज्यावर त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे, ते म्हणतात, “मजा- मस्ती आणि थोडा वेडेपणा करत जगतोय म्हणून आज मी उभा आहे, नाहीतर दोन्ही हातापायांनी साथ सोडलीये, मणक्यात पण फ्रॅक्चर आहे. या वस्तुस्थितीकडे बघत बसलो तर मला काहीच करता येणार नाही, म्हणून वेड्यासारखी बडबड करतोय पण म्हणूनच मी आज जिवंत आहे, काम करतोय:”

भेळपुरी वाल्याचा हा Video तुमचं आयुष्य बदलून टाकेल

हे ही वाचा<< Melodi विसरा, जॉर्जिया मेलोनी यांच्या मोबाईल कव्हरचीच तुफान चर्चा! लिहिलेले ‘हे’ गुप्त संदेश पाहिलेत का?

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी काकांच्या हजारजबाबीपणाचं कौतुक केलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why you should eat street food delhi bhelpuri stall owner lmao moments captured destroys kapil sharma in one minute video svs

First published on: 07-12-2023 at 19:28 IST
Next Story
ग्राहकांकडून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये चुकीच्या ऑर्डर्सदेखील हसून स्वीकारल्या जातात! काय आहे यामागचे कारण, पाहा…