Viral video: जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. शिकार करण्याचं काम सिंहिणीचं आहे. त्या शिकार शोधत जंगलात फिरतात आणि मग त्यांना पकडतात. मात्र, शिकार करताना अनेकवेळा त्या स्वतःच अडकतात, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहिणीचा जीव धोक्यात आल्याचं दिसत आहे.

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. हायनांचा कळप जंगलाच्या राणीला घेरतो. त्यानंतर सिंहिंण एकटीच त्यांच्यासोबत लढा देते. सिंहीण हायनांच्या कळपात अडकते. त्यानंतर हायना तिच्यावर अशा प्रकारे हल्ला करतात, जसं मुंग्या साखरेच्या दाण्यावर हल्ला करतात. ते सिंहीणीला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत असतात. ती जोरजोरात डरकाळ्या काढून हायनांना घाबरवते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की सिंहिण कशाप्रकारे हायनांच्या गटावर कसा हल्ला करते. मग सर्व हायना तिथून विजेच्या वेगाने पळून गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Anant Ambani: अनंत अंबानींचं लक्झरी घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; किंमत इतकी की मुंबईत घ्याल सी फेसिंग घर

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.