घर बसल्या पैसे कमवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर केंद्रात सत्तेत असणारी मोदी सरकार तुम्हाला १५ लाख रुपये जिंकण्याची संधी घेऊन आलीय. तुम्हाला यासाठी केवळ एक नाव सुचवावं लागणार आहे किंवा एखादा लोगो अथवा टॅगलाइन तयार करुन पाठवावी लागणार आहे. माय जीओव्ही इंडियाने (My Gov India) ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती शेअर केलीय. १५ ऑगस्टपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कशाप्रकारे लाखो रुपये जिंकता येतील याबद्दल जाणून घेऊयात..

माय जीओव्ही इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. ट्विटमध्ये दिलेल्या मजकुरानुसार एक क्रिएटीव्ह नाव, टॅगलाइन आणि लोगो बनवण्याची ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा डेव्हलपमेंट फाइनॅनशियल इन्स्टीट्यूशन म्हणजेच डीएफआयसाठी आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास पाच लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

डिपार्टमेंट ऑफ फाइनॅनशियल सर्व्हिसेस, अर्थमंत्रालयाने लोकांकडून डेव्हलपमेंट फाइनॅनशियल इन्स्टीट्यूशनला काय नाव देता येईल, त्याची टॅगलाइन काय हवी आणि त्याचा लोगो कसा हवा यासंदर्भातील सल्ले मागवले आहेत. संस्थेचं नाव, लोगो आणि टॅगलाइन हे संस्थेचं काय काम आहे हे दाखवणारं हवं किंवा त्याचा कल्पना या गोष्टींमधून यायला हवी अशी अपेक्षा आहे.

यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी सुचवलेली नावं, टॅगलाइन आणि लोगो डीएफआयशी संबंधित असणं गरजेचं आहे. खरं तर हे एखाद्या व्हच्यूअल सिग्नेचरप्रमाणे असणं अपेक्षित आहे. म्हणजेच याचा उच्चार करणे, तो लोगो लक्षात राहण्यासाठी सोपा असावं अशी अपेक्षा आहे. नावं, टॅगलाइन आणि लोगो हे एकमेकांशी संबंधित मात्र त्याचवेळी वेगवेगळे पाहिले तरी लगेच ओळखू येणारे हवेत.

कसं सहभागी होता येईल?

>> आधी mygov.in पोर्टलला भेट द्या.
>> येथे लॉग इन टू पार्टिसिपेटच्या टॅबवर क्लिक करा.
>> त्यानंतर नोंदणीसाठी डिटेल्स भरा
>> नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे नाव, टॅगलाइन आणि लोगोसाठी वेगळी एन्ट्री करावी लागणार आहे.

बक्षीस काय?

ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना लाखो रुपयांची रोख रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक जाहीर केला जाणार आहे.
>> नावासाठीची बक्षिसं – पाच लाख रुपये (पहिल्या क्रमांकाचे बक्षीस), तीन लाख रुपये (दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस) आणि दोन लाख रुपये (तिसऱ्या क्रमाकांचे बक्षीस)
>> टॅगलाइनसाठी बक्षिसं – पाच लाख रुपये (पहिल्या क्रमांकाचे बक्षीस), तीन लाख रुपये (दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस) आणि दोन लाख रुपये (तिसऱ्या क्रमाकांचे बक्षीस)
>> लोगोसाठी बक्षिसं – पाच लाख रुपये (पहिल्या क्रमांकाचे बक्षीस), तीन लाख रुपये (दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस) आणि दोन लाख रुपये (तिसऱ्या क्रमाकांचे बक्षीस)

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/task/name-tagline-and-logo-contest-development-financial-institution/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.