जगात अनेक चमत्कारी घटना घडत असतात. काही घटना तर अशा असतात; ज्या ऐकून लोकांना धक्का बसतो. आज तुम्हाला अशाच एका चमत्कारी घटनेविषयी सांगणार आहोत; ज्यात एक महिला १४,५०० फूट उंचीवरून खाली पडूनही वाचते. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, हे कसे काय घडले? इतक्या उंचीवरून पडूनही त्या महिलेचे प्राण वाचले कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही घटना १९९९ सालची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंग्यांमुळे वाचला महिलेचा जीव

ज्या महिलेबद्दल आपण बोलत आहोत, ती महिला १४,५०० फूट उंचीवरून आकाशातून खाली पडते आणि त्यानंतरही ती जिवंत राहते. ही महिला म्हणजे माजी अमेरिकन स्कायडायव्हर जॉन मरे. सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे मुंग्यांमुळे ही महिला जिवंत राहू शकली. ती पडल्यानंतर शेकडो मुंग्यांनी महिलेला चावा घेतला नसता, तर तिचा जीव वाचू शकला नसता. या महिलेसाठी मुंग्या अगदी देवदूत ठरल्या. ही महिला थेट मुंग्यांच्या वारुळावर जाऊन पडली.

एका रिपोर्टनुसार जॉन मरेने चेस्टन काउंटी, साउथ कॅरोलिनामधून उडी घेतली; परंतु उडी मारल्यानंतर तिचे मुख्य पॅराशूट उघडलेच गेले नाही आणि फक्त बॅकअप पॅराशूटच उघडू शकले. त्यामुळे ती ताशी ८० मैल वेगाने पृथ्वीवर पडली आणि ती थेट मुंग्यांच्या वारुळावर जाऊन पडली आणि जोरात श्वास घेऊ लागली. मुंग्या जॉन मरेला २०० हून अधिक वेळा चावल्या. मुंग्यांच्या त्या विषारी डंखांमुळे जॉनच्या हृदयापर्यंत सतत वेदना जाणवत होत्या, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिचे हृदय सतत जोरजोरात धडकत राहिले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; ज्यामुळे तिचे प्राण वाचले, असे डॉक्टरांचे मत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman fell from height of 14500 feet but ants saved her life see photo sjr
First published on: 03-12-2023 at 14:15 IST