घरात साप शिरला असेल आणि त्यातही कोब्रा तर अनेकांची भंबेरी उडेल. मात्र घरात शिरलेल्या कोब्राला बाहेर जाण्यासाठी विनवणी करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. महिला एका लहान मुलाप्रमाणे सापाला घराबाहेर जाण्याची विनवणी करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कोब्रा समोर असतानाही महिलेने दाखवलेल्या संयमांचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

साप कसा पकडू नये? जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पाहाच

कोईम्बतूरमध्ये ही घटना घडली आहे. हातात काठी घेतलेली महिला कोब्राला घऱाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. ती कोब्राला गेटच्या दिशेने जाण्यासाठी विनवणी करत आहे. इतकचं नाही तर नंतर तुझ्यासाठी दूध घेऊन येते असंही सांगत आहे.

यानंतर साप घऱाबाहेर जाताना दिसतो. यानंतरही महिला कोब्राला समजावत असून पुन्हा घरात येऊ नको अशी विनंती करते. इतकंच नाही तर सुरक्षेसाठी माणसाच्या संपर्कात येऊ नको असा सल्लाही देते. महिलेने सापाप्रती दाखवलेलं प्रेम, आदर याचं कौतुक होत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये साप कसा पकडू नये याचं स्पष्ट उदहारण दिसत आहे.

फुटेजमध्ये, सुरुवातीला फक्त १४ फूट किंग कोब्राची शेपटी दिसते. बाथरूमच्या दरवाजातून बाहेर तो डोकावत आहे. साप पकडणारा शेपूट पकडण्यासाठी खाली वाकतो आणि त्याला स्वतःकडे खेचू लागतो. यावेळी कोब्रा अचानक डोके वर काढतो. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.