रेल्वेचा प्रवास करताना स्वत:चा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासन सतत करीत असते. तरीही रेल्वेचे नियम मोडून अनेक लोकांचे स्वत:चा जीव धोक्यात घालणे सुरूच आहे. ट्रेननं प्रवास करताना सावध राहा, दरवाज्यावर उभं राहू नका, खिडकीबाहेर हात काढू नका, ट्रॅक ओलांडू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात. कारण ट्रेनचा वेग प्रचंड असतो. ट्रेन शेजारून गेली तरी नुसत्या हवेनंसुद्धा आपण उडू शकतो, पण काही लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियम मोडणं हा प्रकार काही लोकं जाणून बुजून करतात. रेल्वेस्थानकावर हा प्रकार खूप दिसतो. रीतसर पलीकडे जायचा मार्ग असतानासुद्धा लोकं कधी कधी रेल्वे रुळावरून पलीकडे जातात. अशीच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेस्थानकावर प्रियकराशी वाद झाल्यानंतर एक तरुणी रेल्वे रुळावर उतरली आणि त्याचवेळी वेगवान ट्रेन आली. तरुणी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली आणि नंतर काय घडलं ते जाणून घ्या…

(हे ही वाचा: रेल्वेकडे तक्रार करूनही कार्यवाही न केल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी फोडल्या एसी कोचच्या काचा; व्हिडीओ व्हायरल)

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण आग्राच्या राजा की मंडी रेल्वेस्थानकाचे आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास तरुणी प्लॅटफॉर्मवर हजर होती आणि तिच्या प्रियकराशी बोलत होती. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका पेटला की ती महिला सरळ प्लॅटफॉर्मवरून खाली उतरली आणि इतक्यात ट्रेन आली.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला रुळावरून खाली उतरताच एक हायस्पीड ट्रेन पोहोचली. तरुणी प्लॅटफॉर्मच्या दिशेने परत येऊ लागली, पण तोपर्यंत तिला ट्रेनची धडक बसली आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली. तिला लांबपर्यंत ओढून नेण्यात आले असून ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव भारती आणि पुरुषाचे नाव प्रिन्स आहे अशी माहिती आरपीएफने दिली आहे. घटनेमुळे रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेवरून असे दिसत आहे की, तरुणी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. 

येथे पाहा व्हिडीओ

ही ट्रेन केरळ एक्स्प्रेस होती, जी आग्रा कँटहून राजा की मंडी स्टेशनच्या दिशेने येत होती. ही तरुणी ट्रेनच्या मध्ये सापडली असल्याने स्टेशनवर लगेच ट्रेन थांबविण्यात आली. लगेच धावत त्या तरुणीचा प्रियकर तिच्याकडे गेला. काही वेळातच स्टेशनवर गर्दी जमली. तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जीआरपीने तिला बाहेर काढून एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे, मात्र तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman jumps on railway track after argument with boyfriend video viral pdb
Show comments