देशात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमाल तापमानात वाढ झाली आहे. सध्या देशातील अनेक राज्ये उष्णतेच्या तडाख्यात आहेत. उन्हाळ्यात लोक घराबाहेर पडण्याआधी दोनदा विचार करतात. अशा परिस्थितीत प्रवासाचा विचार करणेसुद्धा अशक्य वाटते, पण कामामुळे बाहेर निघावेच लागते. एवढ्या उन्हात जनावरांप्रमाणे ट्रेनमधून प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानं रेल्वेमधील गर्दी वाढली आहे. त्यातच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचा ताण रेल्वेवर पडतोय.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये आरक्षित प्रवासी उभे राहून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये दिसते की, ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरली असून अनेक लोक ट्रेनमध्ये चढण्याची कसरत करत आहेत. ज्या प्रवाशांना स्थानकावर उतरायचे आहे, त्यांनाही मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका एसी कोचचा एसी काम करत नाही, तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. आनंद विहारहून पाटण्याकडे जाणाऱ्या ट्रेनचा एसी तुटला. उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत होते. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही कार्यवाही होत नव्हती, त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी डब्याच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यानंतर बाहेरची हवा आल्यावर त्यांना थोडा दिलासा मिळाल्याची माहिती आहे.

(हे ही वाचा : धोनीला विमानात पाहताच प्रवाशाने गुपचूप बनवला क्यूट Video; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “आजचा सर्वात…”)

आनंद विहारहून पाटण्याकडे जाणाऱ्या ०३२५६ विशेष ट्रेनच्या एसी बोगीची काच प्रवाशांनी फोडली. वास्तविक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवर प्रवाशांनी खराब एसीबद्दल तक्रार केली होती, परंतु रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यानंतर उन्हामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी काचा फोडल्या.

खचाखच भरलेल्या ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, हा फोटो पाटणा जंक्शनवरील १५६५८ ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसच्या एसी-३ कोचचा आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि आमच्या सीटपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला. एसी-३ चा ताबा सर्वसामान्य प्रवाशांनी घेतला आहे, “कोणीही नियमांची पर्वा करत नाही.”

येथे पाहा व्हिडीओ

प्रवाशाने सांगितले की, त्याने आपल्या कुटुंबासाठी आठ जागा बुक केल्या होत्या, पण कसा तरी तो सहा जागांवर पोहोचला, तर दुसरे कोणी तरी दोन सीटवर बसले होते. त्यांनी सांगितले की, गर्दी एवढी होती की लोकांना शौचालयातही जाता येत नव्हते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रवासी जनरल डब्यासारख्या एसी कोचमध्ये प्रवास करत आहेत. व्हिडीओ शेअर करून लोक रेल्वेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, परिस्थितीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.