प्रेम ही अशी एक भावना आहे जे माणसाला सर्व काही विसरण्यास भाग पाडते. प्रेम वय, जात, रंग-रूप, पैसा पाहून होत नाही, असे म्हणतात. प्रेमात बुडालेली व्यक्ती बहुतेकदा भावनिक निर्णय घेते. मात्र या निर्णयामुळे त्या व्यक्तीला कधीकधी पश्चातापही करावा लागू शकतो. अशीच एक घटना एका महिलेबरोबर घडली आहे. जेव्हा तिला तिच्या प्रियकराची सत्यता समजली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

३५ वर्षीय स्टेला पॅरिस ही महिला एका इसमासह जवळपास वर्षभर रिलेशनशिपमध्ये होती. हा इसम कोणतीही सामान्य व्यक्ती नसून अट्टल गुन्हेगार होता. तो एका माणसाचा खून करून फरार झाला होता. मात्र स्टेलाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेव्हा तिला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला.

२०१२ साली माल्टा स्ट्रिप क्लबमध्ये स्टेलाची भेट ख्रिस्तोफर गेस्ट मोरशी झाली. त्याने स्टेलाला स्वतःची ओळख अँड्र्यू लॅम्ब अशी करून दिली. सुरुवातीला संपत्ती पाहून स्टेला ख्रिस्तोफरकडे आकर्षित झाली. मात्र काही दिवसानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. डेली स्टारच्या वृत्तानुसार, स्टेलाला त्याचे अतिशय सकारात्मक, उत्साही आणि व्यवसायाभिमुख व्यक्तिमत्त्व आवडले. तिला त्याच्यामध्ये काहीतरी रहस्यमय वाटले, परंतु तो गुन्हेगार असल्याची कल्पना तिला नव्हती.

अडीच लाख रुपये टीप देणाऱ्या ग्राहकाविरोधात रेस्टॉरंटनेच केली तक्रार; जाणून घ्या हे अजब प्रकरण आहे तरी काय

स्टेलाच्या म्हणण्यानुसार, ख्रिस्तोफर हा खूपच कंट्रोलिंग होता. तो कधीही तिला त्याच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू देत नसे. त्याचे लांब केस तो घरी असताना बांधून ठेवायचा, मात्र घराबाहेर पडल्यावर तो मुद्दाम केस मोकळे सोडायचा. वर्षभर चाललेल्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात स्टेला अतिशय आनंदात होती, पण काही दिवसानंतर ख्रिस्तोफरच्या हिंसक वर्तनामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. या घटनेला सहा वर्ष झाल्यानंतर तिला जे कळले, त्यानंतर तिला धक्काच बसला. तिला कळले की ख्रिस्तोफरने २००३ साली एका व्यक्तीची हत्या करून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. सध्या तो २४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.