इ.स. १९३७ च्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. देशातील ११ प्रांतापकी संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, मद्रास, बिहार व ओरिसा या पाच प्रांतात पक्षाला निर्वविाद बहुमत मिळाले, मुंबई, बंगाल, आसाम व वायव्य सरहद्द प्रांत या चार प्रांतात काँग्रेसला निर्वविाद बहुमत मिळू शकले नाही ; पण कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष हे स्थान त्याला प्राप्त झाले. पंजाब व सिंध या दोन प्रांतात मात्र काँग्रेस अल्पमतात राहिली. सर्व प्रांतात मिळून काँग्रेसने एकूण ११६१ जागा लढविल्या. त्यांपकी ७१६ जागा तिने जिंकल्या. भारतीय जनता काँग्रेसलाच आपला खरा प्रतिनिधी मानते हे या निवडणुकीने दाखवून दिले. काँग्रेस मंत्रिमंडळाचे राजीनामे : १ सप्टेंबर, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. त्याची प्रतिक्रिया म्हणून ३ सप्टेंबर, १९३९ रोजी इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने युरोपात दुसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. ३ सप्टेंबर १९३९ रोजी भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यानेही भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करण्यापूर्वी त्याने भारतीय नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते किंवा त्यांच्याशी कसलीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे ऑक्टोंबर, १९३९ मध्ये आठ प्रांतांतील काँग्रेसच्या मंत्रिमंडळानी राजीनामे दिले. क्रिप्स मिशन : दुसऱ्या महायुद्धाचे पारडे जर्मनीच्या बाजूने झुकू लागल्याने इंग्लंड व त्यांच्या राष्ट्रांची मोठी अडचण निर्माण झाली.
अशा प्रसंगी काँग्रेस व भारतीय जनतेचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतीय नेत्यांशी बोलणी करून तडजोड घडवून आणण्यासाठी नियुक्त करण्यात आले. सर स्टफोर्ड क्रिप्स २२ मार्च १९४२ रोजी भारतात येऊन त्यांनी भारतातील निरनिराळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली व या आधारावर त्यांनी योजना सादर केली. या योजनेलाच
‘क्रिप्स योजना’ असे म्हणतात. या योजनेत असे सांगण्यात आले होते की युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतींचे स्वराज्य देण्यात येईल. भारतात संघराज्य शासन स्थापन करण्यात येईल तसेच संघराज्यांची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी नवीन घटना समिती बनविण्यात येईल. तसेच संस्थानिकांना स्वनिर्णयाचा हक्क देण्यात येईल. काँग्रेसला क्रिप्स मिशनमधील तरतुदी मान्य झाल्या नाहीत. गांधीजींनी या योजनेचे वर्णन ‘बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक’ अशा शब्दात केले. या योजनेमध्ये पाकिस्तानच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने मुस्लीम लीगने ही योजना फेटाळून लावली.
भारत छोडो आंदोलन (१९४२) : क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी चळवळ अजून प्रखर करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने केला. वर्धा येथे ६ ते ९ जुल १९४२ या दरम्यान काँग्रेस वìकग कमिटीच्या बठकीत भारत छोडो आंदोलन व त्याची दिशा यांवर चर्चा झाली. तसेच १४ जुल १९४२ रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वìकग कमिटीच्या बठकीत चले जाव आंदोलनाचा ठराव पास करण्यात आला.
७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली. चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा १२ कलमी होता. ८ ऑगस्ट, १९४२ च्या रात्री महात्मा गांधी, मिराबेन, कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले, तसेच पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोिवद वल्लभपंत यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते
गोठविण्यात आले होते.
त्रिमंत्री योजना : दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना
सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी
धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.
माउंटबॅटन योजना : २४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या
योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या
भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील
तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
रेल्वेसंबंधी उदाहरणे
१) १५० मीटर आणि ५० मीटर लांबीच्या ट्रेन समांतर रूळावरून अनुक्रमे ३५ किमी/तास आणि ३० किमी/ तास या वेगाने जात आहे. जर त्या ट्रेन एकाच दिशेने धावत असतील तर त्या एकमेकांना केव्हा
ओलांडतील?
१) १५० सेकंद २) १५५ सेकंद ३) १४४ सेकंद ४) १३३ सेकंद
उत्तर : अंतर = १५० + ५० = २०० मीटर
रेल्वे एकाच दिशेने धावत आहे म्हणजे त्यांचा सापेक्ष वेग = ३५-५
किमी./ तास ५ x ५ / १८ = २५ / १८ मी./ सेकंद म्हणून वेळ = अंतर २०० २०० x १८ = १४४ सेकंद वेग २५/१८ २५
२) एक रेल्वे पुणे ते नाशिक ४० किमी प्रतितास या वेगाने जाते व नाशिक
ते पुणे ६० प्रतितास या वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
१) ५० किमी प्रतितास २) ६० किमी प्रतितास
३) ४८ किमी प्रतितास ४) ५८ किमी प्रतितास
सरासरी वेगासाठी खालील सूत्र लक्षात ठेवावे.
सरासरी वेग = २ x पहिल्या गाडीचा वेग x दुसऱ्या गाडीचा वेग
पहिल्या गाडीचा वेग + दुसऱ्या गाडीचा वेग
उत्तर : = २ ४x० ४ ०+ x६ ०६० = ४१८०००० = ४८ किमी प्रतितास
३) २५० मीटर लांबीची रेल्वे ५४ किमी प्रतितास व ३५० मीटर लांबीची
रेल्वे १८ किमी प्रतितास एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास
त्या एकमेकांना किती वेळानंतर ओलांडतील?
१) ३० सेकंद २) ४० सेकंद ३) ५० सेकंद ४) ६० सेकंद
सूत्र : वेळ = अंतर
वेग
या ठिकाणी दोन रेल्वेंची लांबी दिलेली आहे २५० मीटर व ३५० मीटर म्हणून त्यांची एकूण लांबी
(२५० + ३५० = ६०० मीटर) व एकूण वेग = (५४ + १८ = ७२ किमी पर तास आगगाडय़ा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील
म्हणून बेरीज करावी.)
७२ x ५
१८ = २० म्हणून, वेग = ६००
२० = ३० सेकंदात एकमेकींना ओलांडतील.
४) दोन रेल्वे एकाच दिशेने ७२ किमी प्रतितास व ९० किमी प्रति तास या वेगाने धावत आहेत. जर वेगाने
धावणारी रेल्वे दुसऱ्या रेल्वेला एका मिनिटात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती?
१) ४०० मीटर २) ३०० मीटर ३) ५०० मीटर ४) ६०० मीटर
उत्तर : अंतर = वेग x वेळ (या ठिकाणी अंतर म्हणजे रेल्वेची लांबी)
त्या रेल्वे एकाच दिशेने धावत आहेत म्हणून त्यांचा सापेक्ष वेग = ९० – ७२ = १८ किमी प्रतितास
१८ x ५ १८ = ५ मीटर वेग = १ मिनिट = ६० सेकंद
म्हणून रेल्वेची लांबी = वेग x वेळ = ५ x ६० = ३०० मीटर
५) राजधानी एक्सप्रेस ही ४० किमी प्रतितास या वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते, परंतु ६० किमी प्रतितास या वेगाने गेल्यास ही २० मिनिटे आधी पोहोचते तर राजधानी एक्सप्रेस या रेल्वेने किती अंतर
कापलेले असेल?
१) ४० किमी २) ५० किमी ३) ६० किमी ४) ७० किमी
उत्तर : जेव्हा वरील प्रकारचे उदाहरण असेल तेव्हा जास्त आकडेमोड न
करता उदाहरण सोडवायचे असेल तर हे उदाहरण पुढीलप्रमाणे सोडवावे.
रेल्वेने कापलेले अंतर = वेग x वेळ
(जर उदाहरणात रेल्वेचा वेग दिलेला असेल, वरील उदाहरणात ४० किमी प्रतितास व ६० किमी प्रतितास असा दिलेला आहे. तसेच उदाहरणात ती लवकर पोहोचते किंवा उशिरा पोहोचते असे दिलेले असेल तर वेगांचा लसावि करून घ्यावा. म्हणजे थोडक्यात वरील सूत्र खालीलप्रमाणे लिहिता येईल व ते या प्रकारचे उदाहरण सोडविण्यास
लक्षात ठेवावे.)
म्हणून : रेल्वेने कापलेले अंतर = वेगाचा लसावि x वेळ = १२० x १३ = ४० किमी प्रतितास
(या ठिकाणी वेग किमी प्रतितास यात दिलेला आहे म्हणून वेळ देखील तासात करावा लागेल. म्हणजे २० मिनिटे = २०
६० = १३)
६) एक रेल्वे मुंबईहून पुण्यापर्यंत ५० किमी प्रतितास या वेगाने सकाळी ७ वा. निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी ८ वा. ६० किमी प्रतितास या वेगाने निघाली तर त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता
भेटतील?
१) ४ वा. २) ३ वा. ३) २ वा. ४) १ वा.
उत्तर : जेव्हा रेल्वे एकाच दिशेने जात असतील व त्यांचा वेग व त्या केव्हा निघाल्यात हे दिलेले असेल तर या प्रकारचे उदाहरण सोडविण्यासाठी खालील पद्धत वापरावी.
भेटण्यासाठी लागणारा वेळ = पहिल्या गाडीचा वेग x वेळेतील फरक वेगातील फरक = ५० x १ तास
१० = ५ तास
(म्हणून ८ + ५ तास म्हणून १ वाजता भेटतील).
एमपीएससी