दूधउत्पादन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांविषयीचे अभ्यासक्रम आणि या क्षेत्रातील करिअर संधी-

शेतीवर आधारित उद्योगामध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा दुग्ध व्यवसायाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे  स्थान महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसायात प्रामुख्याने दुभत्या जनावरांचे पालनपोषण (डेअरी फार्म), दूधउत्पादन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश केला जातो. प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीतून भारताला चांगले परकीय चलन प्राप्त होते.
हे क्षेत्र आता स्पेशलाइज्ड बनले असून त्यात दूधनिर्मिती, दूध संकलन, साठवणूक, प्रक्रिया आणि वितरण अशा बाबी  समाविष्ट होतात. संबंधित तज्ज्ञाला दुग्धप्रक्रियेच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे लागते. प्रक्रिया उद्योगामध्ये विविध पदार्थाच्या निर्मितीचाही समावेश होतो. या विषयातील तज्ज्ञ पदार्थाच्या निर्मितीवर आणि गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष ठेवतात. याशिवाय या पदार्थाच्या निर्मितीसाठी प्रगत पद्धती किंवा यंत्रणा विकसित करून वापर करण्यात या तंत्रज्ञांचा सहभाग असतो. दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्यांच्या सुरक्षित साठवणुकीकडे या तंत्रज्ञांना लक्ष पुरवावे लागते. दुग्धप्रक्रिया संयंत्राची देखभाल, दुरुस्तीचे काम या विषयाशी संबंधित अभियंते- डेअरी अभियंते करतात. या पदार्थाची अधिकाधिक विक्री करण्यासाठी मार्केटिंग विषयातील तज्ज्ञांची गरज भासते.
डेअरी हा विषय पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अभ्यासक्रमाशी संबंधित आहे. बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंड्री यांसारखे अभ्यासक्रम कृषी विद्यापीठामार्फत चालवले जातात. याशिवाय डेअरी सायन्स या विषयाशी संबंधित पदवीस्तरीय स्वतंत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
आपल्या देशात चारशे ते पाचशे डेअरी संयंत्रे असल्याने या विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना डेअरी फार्म, ग्रामीण बँक, दुग्धजन्य पदार्थ प्रकिया संयंत्रे, दुग्धजन्य पदार्थनिर्मिती संस्था, सहकारी संस्था अशा सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतही करिअर संधी मिळतात. गुणवत्ता नियंत्रण करण्याच्या कामात डेअरी तंत्रज्ञांना संधी मिळू शकते. हे तंत्रज्ञ लहान प्रमाणावरील दूधप्रक्रिया संयंत्रे, आइस्क्रीमनिर्मिती घटक, क्रीमनिर्मिती आदी स्वयंरोजगारसुद्धा करू शकतात. या तंत्रज्ञांना कृषी विद्यापीठे, महाविद्यालये, खासगी संस्था येथे संशोधनाची, अध्यापनाची संधी मिळू शकते. डेअरी टेक्नालॉजीच्या शिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* नॅशनल डेअरी रिसर्च टेक्नालॉजी, कर्नाल
या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात-
= बी. टेक इन डेअरी टेक्नालॉजी. कालावधी- चार वष्रे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासह बारावी विज्ञान परीक्षा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशातील विविध केंद्रांवर प्रवेशपरीक्षा घेतली जाते.
= पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- हा अभ्यासक्रम संस्थेच्या कर्नाल, बेंगळुरू आणि कल्याणी या ठिकाणी करता येतो. कालावधी- ज्या उमदेवारांनी तीन वर्षांचा कृषी अभ्यासक्रम केला असेल त्यांच्यासाठी तीन वष्रे आणि ज्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम केला आहे, त्यांच्यासाठी चार वष्रे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी अखिल भारतीय स्तरावर प्रवेशपरीक्षा घेतली जाते. अर्हता- संबंधित विषयातील पदवी.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हे डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, डेअरी इंजिनीयिरग, अ‍ॅनिमल बायोकेमिस्ट्री, अ‍ॅनिमल जेनेटिक्स अ‍ॅण्ड ब्रीिडग, लाइव्हस्टॉक प्रॉडक्शन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, अ‍ॅनिमल न्युट्रिशन, अ‍ॅनिमल सायकॉलॉजी, डेअरी इकॉनॉमिक्स, अ‍ॅनिमल रीप्रॉडक्शन, गायनाकॉलॉजी अ‍ॅण्ड ओबेसिटी, फूड क्वालिटी अ‍ॅण्ड अ‍ॅश्युरन्स, डेअरी एक्स्टेन्शन एज्युकेशन या विषयांमध्ये करता येतात.
= संशोधन (डॉक्टोरल प्रोग्रॅम)- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. या संशोधन प्रकल्पासाठी प्रवेशपरीक्षेद्वारे निवड केली जाते. पत्ता- नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट, कर्नाल- १३२००१.
  वेबसाइट-  http://www.ndri.res.in
* कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद
या संस्थेत बी.टेक- डेअरी टेक्नॉलॉजी आणि एम.टेक डेअरी टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम करता येतात.
पत्ता- डीन, एसएमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद, अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सटिी, आणंद.
ईमेल- prinpaldsc@aau.in
 वेबसाइट- www. aau.in
* डेअरी सायन्स इन्स्टिटय़ूट
या संस्थेत दोन वर्षांचा डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशजागा- ४०. अर्हता- बारावी विज्ञान शाखा. कालावधी दोन वष्रे. हा अभ्यासक्रम नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्यशास्त्र विद्यापीठाशी संलग्न आहे. पत्ता- आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६५, अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत
५० टक्के गुण. ईमेल- pricipalsdsi@gmail.com
* कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उद्गीर
कालावधी- चार वष्रे. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन डेअरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो. पत्ता- व्हेटर्नरी उपकेंद्र, उद्गीर- ४१३५१७.
वेबसाइट-  cdtudgir.in
ईमेल- cdtudgir.in@gmail.in
* कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड, पुसद.    बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन डेअरी टेक्नॉलॉजी. कालावधी- चार वष्रे.
वेबसाइट- http://www.cdtpusad.in
ईमेल- addtcwarud@gmail.in
या अभ्यासांतर्गत ट्रॅडिशनल डेअरी प्रॉडक्ट्स, फॅटरिच ड्राय प्रॉडक्ट्स, आइस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट्स, बायप्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग ऑफ डेअरी प्रॉडक्ट्स, जजिंग ऑफ डेअरी प्रॉडक्ट्स, डेअरी प्लॅन्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पोल्युशन कंट्रोल, कंडेन्स्ड अ‍ॅण्ड ड्राइड मिल्क, फूड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
याच संस्थेमार्फत बीटेक इन डेअरी केमिस्ट्री, बीटेक इन डेअरी मायक्रोबायोलॉजी, बीटेक इन डेअरी इंजिनीयिरग, डेअरी बिझनेस मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्यात आले आहेत.
*शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय
 येथील डिपार्टमेंट ऑफ डेअरी सायन्स येथे अभ्यासक्रम- बीएस्सी-  डेअरी टेक्नॉलॉजी.
पत्ता- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,
कळंब, जिल्हा उस्मानाबाद- ४१३५०७.
वेबसाइट- mohekarcollege.org
ईमेल- smdmk@gmail.com
* कर्नाटक व्हेटेर्नरी, अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड फिशरीज सायन्सेस युनिव्हर्सिटि
संस्थेच्या बेंगळुरू कॅम्पसमध्ये बीटेक इन डेअरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येतो.
पत्ता- नंदीनगर, बिदर- ५८५४०१.

सुरेश वांदिले – ekank@hotmail.com