भारतीय नौदलात युवतींसाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधींची ओळख आणि कित्तूर येथील स्कूल ऑफ गर्ल्स या निवासी सैनिकी शाळेच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौदलात युवतींना संधी
नौदलातील विविध कार्यकारी शाखांमध्ये शॉर्ट सíव्हस कमिशनद्वारे युवतींना करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार शिक्षण, विधि आणि नेव्हल आíकटेक्चर या विद्याशाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशन देण्यात येते.
विविध शाखा
लॉजिस्टिक्स (पुरवठा) : वयोमर्यादा- किमान साडे एकोणीस वर्षे आणि कमाल- २५ वर्षे. अर्हता- प्रथम श्रेणीत बी.ए. इकॉनामिक्स किवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. (इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी किंवा सीए किंवा आयसीडब्ल्यूए किंवा मेकॅनिकल/ सिव्हिल/ मरिन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी/ आíकटेक्चर या शाखेतील बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका.
निरीक्षण : वयोमर्यादा- किमान १९ वर्षे आणि कमाल
२३ वर्षे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. विद्यार्थिनींनी बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा.
शिक्षण : वयोमर्यादा- किमान २१ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. अर्हता- ५० टक्के गुणांसह एम.एस्सी. (भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन). विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह बी.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील बी.ई किंवा बी.टेक. पदवी
प्राप्त असावी.
विधि : वयोमर्यादा- किमान २२ वर्षे आणि कमाल २७ वर्षे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह विधि शाखेतील पदवी आणि वकील म्हणून काम करण्याची पात्रता प्राप्त करणे आवश्यक.
एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : वयोमर्यादा- किमान साडेएकोणीस वर्षे आणि कमाल- २५ वर्षे. अर्हता- प्रथम श्रेणीसह भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील बी.एस्सी. किंवा ५५ टक्के गुणांसह भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील एम.एस्सी.
शॉर्ट सíव्हस कमिशन : नेव्हल आíकटेक्चर (शिल्पशास्त्र किंवा वास्तुकला)- वयोमर्यादा किमान २१ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह नेव्हल आíकटेक्चर/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मेटॅलर्जकिल/ एरोस्पेस या शाखेतील बीई किंवा बीटेक.
विद्यापीठ प्रवेश योजना (युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम)- नेव्हल आíकटेक्चर (शिल्पशास्त्र किंवा वास्तुकला)- वयोमर्यादा- किमान १९ वर्षे आणि कमाल- २४ वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह नेव्हल आíकटेक्चर/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मेटॅलर्जकिल/ एरोस्पेस या शाखेतील बीई
किंवा बीटेक.
संपर्क- जेडीएम (ओआय अ‍ॅण्ड आर) खोली क्र. २०५, सी िवग, सेना भवन, नवी दिल्ली- ११००११.
ईमेल- officer-navy@nic.in, user-navy.nic.in
वेबसाइट- http://www.nausena-bharti.nic.in

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Military education for girls
First published on: 12-05-2016 at 05:36 IST