News Flash

बेसन बर्फी

साहित्य : बेसन एक ते दीड वाटी, दूध एक ते दीड वाटी, तूप एक वाटी...

surekha-bhidebesan-barfiसाहित्य : बेसन एक ते दीड वाटी, दूध एक ते दीड वाटी, तूप एक वाटी (दोन ते तीन टे. स्पून तूप बेसन भजण्यासाठी वेगळे घेणे), साखर दोन ते अडीच वाटी, ओले खोबरे- एक ते दीड वाटी, सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स.
विधी : सर्व प्रथम तुपात बेसन भाजून ठेवणे. मग दूध, तूप, साखर, ओले खोबरे सर्व एकत्र कढईत करणे. साखर पूर्ण विरघळली की त्यात बेसन टाकणे. सर्व एकत्र करणे. कडा सुटायला लागल्या की तूप लावलेले थाळीत ओतावे. व वडी कापावी. ही वडी खूपच सुंदर लागते. सजावटीसाठी ड्रायफ्रुटस् घालणे.

coconut-barfiनारळाची बर्फी
साहित्य : ओला नारळ खवलेला दोन वाटी, दूध दोन वाटी, साखर एक ते दीड वाटी, मिल्क पावडर दोन छोटे पॅकेट.
विधी : नारळ खवलेला, दूध, साखर सर्व कढईत एकत्र करून आटवणे. आटत आले की दोन छोटी पाकिटं मिल्क पावडर घालणे. व तूप लावलेल्या थाळीत सेट करून बर्फीचा आकार देणे. ही वडी खूपच सॉफ्ट होते.

mango-barfiआंबा बर्फी
साहित्य : आंब्याच्या रसाचा गोळा विकत मिळतो, किंवा रस आटवून घरी तयार करावा. ओले खोबरे एक वाटी, मिल्क पावडर एक छोटे पाकीट,
साखर दोन वाटी.
विधी : जाड पातेल्यात साखर घालून पाक तयार करणे, त्यात आंबा रस दीड ते दोन वाटी घालणे. ओले खोबरे एक वाटी घालणे. सर्व आटवणे. घट्ट होत आले की मिल्क पावडर घालणे. मग ट्रेमध्ये तूप लावून सेट करणे.

sesame-barfiतिळाची बर्फी
साहित्य : तीळ- एक वाटी, सुकं खोबर- एक वाटी, दाण्याचे कूट एक वाटी (सर्व साहित्य भाजणे मग पूड करणे), साखर अडीच वाटी.
विधी : साखरेचा पाक कढईत करणे. मग सर्व साहित्य (तीळ, खोबरे, दाण्याचे कूट सर्वाची पूड करणे) पाकात एकत्र करणे. हे थोडं घट्ट होत आले की तूप लावलेले ट्रेमध्ये ओतून वडय़ा कापाव्यात. ही वडी सुंदर व खमंग लागते.

mawa-barfiमावा बर्फी (कलाकंद)
साहित्य : मिल्क पावडर सहा पॅकेट्स (छोटे दहा रुपयेवाली), एक फुलपात्र साय, अर्धी वाटी साखर, एक पाव पनीर (पनीर किसून घेणे), एक वाटी दूध.
विधी : दूध, साय, साखर, मिल्क पावडर व पनीर (किसलेले) सर्व एकत्र करणे. घट्ट होत आले की तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे व बर्फी कापावी. ही बर्फी खूपच रुचकर लागते.
सुरेखा भिडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:19 am

Web Title: home recipes
टॅग : Recipes
Next Stories
1 कारिंद्याची खीर
2 चिमके वडे
3 टोमॅटो चटणी
Just Now!
X