वसई: वसई येथे पालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारपासून पुढील दोन दिवस शहरात पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.

वसई-विरार महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या जलवाहिनीला वरई येथे गळती सुरू झाली आहे. या दुरुस्तीचे काम शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून यासाठी १२ तासांचा अवधी लागणार आहे. तसेच या जलवाहिनीतून होणारा पुरवठा हा बंद केला जाणार आहे. तर नवीन योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत चालू राहणार आहे. यामुळे दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणी येणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.