वसई- विरारमध्ये ५५ अनधिकृत इमारतींचे प्रकरण ताजे असताना देखील अनधिकृत इमारती बांधण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. विरारच्या फूलपाडा येथे ४ मजल्याच्या एकूण ५ अनधिकृत इमारती बांधून त्यातील ३८ दुकाने आणि २५८ सदनिकांची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी इमारतीच्या विकासकावर पालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मागील वर्षी विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई विरारमध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्या गेल्याचे प्रकरण उघडकीस आले. यात शासनासह शेकडो कुटुंबांची फसवणूक करण्यात आली होती. जिल्हाधिकार्‍यांपासून पालिकेपर्यंत, महारेरापासून सिडकोपर्यंतच्या सर्व शासकीय विभागांची बनावट शिक्के, लेटरहेड बनविण्यात आली होते. या बेकायदेशीर इमारतींच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जे देऊन सदनिकांची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वसई विरारच्या विविध भागात होती. त्यानंतर अनधिकृत इमारतींच्या प्रकरणाला आळा बसेल अशी आशा होती. परंतु आजही शहरात राजरोस अनधिकृत इमारती बांधल्या जात असल्याचे प्रकार सुरूच आहेत.

thieves broke into a locked house at Karad and stole gold ornaments from the house
घरफोडीत तब्बल ११० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकडही लांबवली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Prepaid rickshaw booth at Pune railway station closed due to traffic police
ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट! वाहतूक पोलिसांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रीपेड रिक्षा बूथ बंद
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी
caught Fire at ten places due to firecracker fire broke out in a third floor flat in Kasarwadi
पिंपरी : फटाक्यांमुळे दहा ठिकाणी आगीच्या घटना; कासारवाडीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला आग

हेही वाचा – वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत

विरार पूर्वेच्या फुलपाडा येथे पालिकेची कुठलीही परवानगी न घेता ५ अनधिकृत इमारती बांधल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. फुलपाडा येथील भूमापन क्रमांक (सर्व्हे नंबर) ८६ हिस्सा नंबर १ या ठिकाणी पालिकेची कुठलीही परवानगी न घेता चार मजल्यांच्या एकूण ५ इमारती तयार करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत इमारतींमधील ३८ दुकाने आणि २५८ सदनिकांची विक्री करून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पालिकेच्या प्रभाग समिती ‘सी’चे (चंदनसार) लिपिक अशोक धानिया यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकासक आणि जमीन मालकांविरोधात महाराष्ट्र नगर रचना प्रांतिक अधिनियमच्या (एमआरटीपीए) कलम ५२, ५३, ५४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा – वसई : आगरी समाजाच्या मतांसाठी राजकीय पक्षांची चढाओढ, आगरी सेनेतही पडले दोन गट

५ अनधिकृत इमारती, २५८ सदनिका

१) गोविंद गीता अपार्टमेट- इमारत क्रमांक ८
४ माळे, २ गाळे ५१ सदनिका

२) गोविंद सृष्टी अपार्टमेंट इमारत क्रमांक ५
४ मजली इमारत, ६ गाळे, ६७ सदनिका

३) गोविंद विकास अपार्टमेंट इमारत क्रमांक ७
४ मजली इमारत, १३ गााळे ४९ सदनिका

४) गोविंद नेस्ट अपार्टमेंट, इमारत क्रमांक ४
४ मजली इमारत १५ गाळे, ५२ सदनिका

५) गोविंद पॅरेडाईज
४ मजली इमारत, २ गाळे, ४० सदनिका

या विकासकांवर दाखल झाले गुन्हे

या प्रकरणी विरार पोलिसांनी ७/१२ वर नाव असलेले जमिनीचे मालक रघुनाथ पाटील तसेच गोविंद गीता इमारतीचे विकासक मिलिंद मालुसरे आणि विकासक शेखर बापू देसाई (गोविंद एनएक्स, गोविंद पॅरेडाईज, जीएन एण्ट्रप्रायझेस, गोविंद सृष्टी) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल म्हस्के या प्रकरणाचा तपास करत आहेत.