सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई, विरार शहरात पालिकेचे किंवा व्यावसायिक खासगी नाटय़गृह नसल्याने नाटय़ चळवळीला खीळ बसली आहे. सरावासाठी सभागृह नसल्याने तसेच सोयीसुविधा नसल्याने कलावंत होण्याची स्वप्ने उराशी बाळगणारे अनेक प्रतिभावान कलावंतांची स्वप्ने धुळीला मिळाली आहे. शनिवारी मराठी रंगभूमी दिन सर्वत्र साजरा होत असताना वसईतील नाटय़ चळवळीची उदासीनता समोर आली आहे.

sculpture, women, sculpture field,
शिल्पकर्ती!
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

वसई, विरार शहरात १५ ते २० नाटकांचे समूह आहेत. या समूहामध्ये वेगवेगळे अडीचशे ते तीनशे तरुण कलावंत आहेत. याशिवाय वरिष्ठ कलावंत वेगळे आहेत. मात्र या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी आवश्यक असणारी पाश्र्वभूमी येथे नाहीत. वसई, विरार शहरात एकही व्यावसायिक नाटय़गृह नाही. त्यामुळे या कलाकारांना सराव करण्यासाठी तसेच आपले प्रयोग सादर करण्याची संधी मिळत नाही. नाटय़गृहाची सोय नसल्याने सरावाला अडचणी येतात. कलाकारांना नाटक सादर करायचे झाल्यास सभागृह मिळते, परंतु त्यात प्राथमिक सोयी नसतात. त्यामुळे विंगा लावणे, पडदे लावणे, ध्वनी यंत्रणा उभारणे इथपासून अगदी खुच्र्या लावण्याची कामे करावी लागतात. नाटय़गृहाअभावी वसईत प्रायोगिक नाटय़ चळवळ रुजू शकली नाही, अशी खंत दिग्दर्शक विलास पागार यांनी व्यक्त केली. त्यांची ‘अधल्या मधल्याची गोष्ट’ आणि ‘मी टू’ ही दोन नाटके सध्या गाजत आहेत. वसईत जर एखादे सभागृह घेतले तरी त्याचे भाडे महाग असते आणि इतर व्यवस्था उभी करण्यासाठी प्रचंड खर्च येतो आणि वेळ जातो. त्यामुळे वसईत प्रायोगिक नाटके होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

वसईतील अभिनेत्री हर्षदा बामणे हिचे ‘वाकडी तिकडी’ हे विनोदी नाटक सध्या गाजत आहे. नाटय़गृह नसल्याने नाटय़कलावंतांबरोबर प्रेक्षकांनादेखील चांगल्या नाटकापासून वंचित राहावे लागते असे तिने सांगितले. वसईत एक खासगी नाटय़गृह आहे. मात्र ते व्यावसायिक नसल्याने आम्हाला सेट कमी करावा लागतो किंवा प्रवेशाचे मार्ग बदलावे लागतात, असे ती म्हणाली. वसईकरांना नाटकासाठी थेट बोरिवलीत जावे लागते असे ती म्हणाली.

पालिकेच्या नाटय़गृहाची रखडपट्टी

वसईत सुसज्ज नाटय़गृह उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. पालिकेने नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील मजिठिया येथे नाटय़गृहाचे काम सुरू केले आहे. मात्र ते मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. दुसरीकडे वसईतील नाटय़गृहासाठी असलेला आरक्षित भूखंडदेखील विकसित झालेला नाही, असे येथे म्हटले जात आहे.

नाटय़गृह नसल्याने नाटय़चळवळीला खीळ बसली आहे. याची कलावंतांना खंत आहे.  वसई, विरारमध्ये अनेक कलावंत आहेत, परंतु आवश्यक  पाठबळ न मिळाल्याने या कलावंतांना संधी मिळालेली नाही. सरावासाठी मुंबईला दररोज ये-जा करणे शक्य नसते. त्यामुळे अनेकांची स्वप्न भंगली आणि ते पोटापाण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात वळले आहेत.  –सागर रानडे, कलावंत