वसई : मागील एक वर्षांपासून वसईतील एका महिला डॉक्टरची बदनामी करणाऱ्या आरोपीला वसई पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने बेडय़ा ठोकल्या आहेत. श्रीकांत जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याने महिला डॉक्टरचे बनावट फेसबुक खाते तयार केले होते. त्याद्वारे तो तिची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे अपलोड करत होता. परंतु या कटाची सूत्रधार डहाणू तालुक्यात कार्यरत असलेली एक ग्रामसेविका असल्याचे तपासात समजते आहे. 

तक्रारदार महिला डॉक्टर असून तिचा वसई येथे दवाखाना आहे. या डॉक्टरचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

pune, Bharti Vidyapeeth police arrested 2 accused, minor's Kidnapping and Rape case, minor girl raped case in pune, pune crime news, crime news, pune news, marathi news, Bharti Vidyapeeth police,
विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

लग्नानंतर तक्रारदार महिलेला त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यांना अज्ञात व्यक्तींकडून वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे गलिच्छ भाषेत फोन आणि पत्रे येत होती. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र त्रास वाढत गेला. या महिला डॉक्टरच्या दवाखान्याला काळे फासण्यात आले तसेच त्यांच्या विरोधात बदनामीकारक पत्रकेसुद्धा त्यांच्या परिसरात वाटण्यात आली. परंतु हा त्रास इतक्यावरच थांबला नव्हता. एका अज्ञात व्यक्तीने या तक्रारदार डॉक्टरच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडले आणि त्यावर तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित केली. शेवटी पीडित महिला डॉक्टरने पोलिसांकडे धाव घेतली.

वसई पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला आणि बदनामी करणाऱ्या श्रीकांत जाधव याला अटक केली. पालघर येथील या व्यक्तीने महिला डॉक्टरच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून तिची बदनामी केली होती. या प्रकरणी त्याच्यावर 354 (ड)  तसेच

माहिती तंत्रज्ञान कायदा 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वसई पोलीस

ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे

परंतु पीडितेच्या बदनामीमागील सूत्रधार एक महिलाच निघाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी श्रीकांत जाधव याने पालघर येथे कार्यरत असलेल्या एका ग्रामसेविकेच्या सांगण्यावरुनच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तिचा या  गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला असून तिला लवकरच अटक केली जाणार आहे.

घडलेला गुन्हा अत्यंत गंभीर असून आम्ही त्याचा सखोल तपास करत आहोत. प्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २)