वसई: एका अल्वपयीन मुलीवर दोन वर्षात दोनदा बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा मध्ये उघडकीस आली आहे. तिच्यावर झालेल्या पहिल्या बलात्कारामुळे झालेल्या बाळाची विक्री देखील करण्यात आली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोन तरुणांसह, रुग्णालयातील डॉक्टर, माजी नगरसेविकेसह १६ जणांवर बलात्कार, पोक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पीडित तरुणी सध्या १७ वर्षांची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे परिसरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली होती. मात्र तिच्या प्रियकराने या प्रकऱणी हात वर केले. त्यामुळे परिसरातील माजी नगरसेविकेच्या मदतीने हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या प्रियकराकडून ४ लाख रुपये घेण्यात आले. माजी नगरसेविका, पीडितेचे आई वडिल, मध्यस्त आदींने हे पैसे वाटून घेतले. त्यानंतर तिची नालासोपारा येथील एका रुग्णलयात प्रसूती करण्यात आली. तिचे बाळ बळजबरीने एका महिलेकडे देण्यात आले आणि त्या बाळाची विक्री करण्यात आली.

Dharavi, rehabilitation,
धारावीकरांच्या पुनर्वसनाला कुर्ल्यातून विरोध, ‘डीआरपीपीए’ला जागा देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची स्थानिकांची मागणी
father arrested for raping two minor daughter in nagpur
संतापजनक! नराधम बापाचा स्वत:च्याच दोन मुलींवर शारीरिक अत्याचार
Kalyaninagar accident case Agarwal couple have Original blood sample how many others are involved in this case
कल्याणीनगर अपघात प्रकरण : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात आणखी काही जण सामील
PM Modi Letter After 45 Hours Meditation
४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”
Pune accident bribe
Pune Accident : रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी लाखो रुपयांची लाच? ससूनच्या कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम जप्त
Hindu marriage- legal rights
विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?
Putin, Putin news, Russia,
विश्लेषण : रशियात एकामागून एक लष्करी सेनापतींना पुतिन बडतर्फ का करत आहेत? भ्रष्टाचाराबद्दल की आणखी काही कारण?
married couple separation marathi news
वैवाहिक जोडीदार कराराद्वारे विभक्त होऊ शकतात का ?

हेही वाचा : तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप

पीडितेवर पुन्हा बलात्कार, दुसऱ्यांदा प्रसूती

हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या पालकांनी आपले घर बदलले. मात्र तेथेही एका तरुणाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या वेळी अमरावती येथील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. मात्र या तरुणाने तिच्याशी लग्नास नकार देऊन तिला सोडून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने एका महिला सामाजिक कार्यकर्त्यासह आचोेळे पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

डॉक्टर्स, माजी नगरसेविकेसह १६ आरोपी

या प्रकरणी आचोळे पोलिसांनी नालासोपारा येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुलीवर बलात्कार करणारे दोन्ही तरूण, मुलीचे आई वडील, माजी नगरसेविका, तसेच मुलीची विक्री करणारी महिला अशा एकूण १६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. बलात्कार, अपहरण, नवजात बाळाचा त्याग करणे, अपहरण आदींच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन) ३१७, ३६३, ३७१ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम ४, ६, ७, १२, २१ सह लहान मुलांच्या ज्युवेनाईल ॲक्ट २०१५ च्या कलम ७५ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलगी अल्वपयीन असतांनाही दोन रुग्णालयांच्या डॉक्टरांनी तिची प्रसूती केली आणि पोलिसांना कळवले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या आई वडिलांनी मुलगी अल्पवयीन असतानाही बाळाची विक्री करण्यास संमती दर्शवली होती म्हणून त्यांना देखील आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : घनकचरा प्रकल्पाला लागणाऱ्या आगीचा उत्तनच्या आंबा उत्पादनाला फटका

आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आता आरोपींना अटक करत आहोत. पुढील तपासात आणखी नावे समोर येण्याची शक्यता असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून अटक करण्याची कारवाई केली जाईल, असे या प्रकरणातील तपासी अधिकार्‍याने सांगितले.