वसई : नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोडवरील द्वाराका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले आहेत. आगीची भीषणता अधिक असल्याने मागील दोन तासापासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

नालासोपारा पूर्वेच्या भागात आचोळे रस्त्यावर द्वारका हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी अचानकपणे गॅस गळती होऊन स्फोट घडला. या स्फोटामुळे आगीची तीव्रता अधिक प्रमाणात वाढली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. या आगीत तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय जे हॉटेल व इमारती अडकून पडलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.

Vasai, eknath Shinde,
वसई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची पाहणी, बचाव कार्य पुन्हा सुरू
fisheries department action against illegal fishing
वसई: बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई सुरू; करंजा येथील ७ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई
poor cement concrete work on highway was investigated by the police
महामार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या निकृष्ट कामाची पोलिसांनी केली पोलखोल
Talathi, molested, teacher,
वसई : अखेर शिक्षिकेचा विनयभंग करणारा तलाठी निलंबित, संतप्त वसईकरांचे तहसीलदार कार्यालयावर आंदोलन
Promotion of 5 policemen in Police Commissionerate
वसई : पोलीस आयुक्तालयातील ५ पोलिसांना बढत्या
Teacher molested by Talathi in Vasai Demand of MLA Hitendra Thakur to dismissal talathi
वसई : तलाठ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग, वसईत संतापाची लाट
Schoolgirl revert cyber prankster money fraud
वसई : शाळकरी मुलीने उलटवला सायबर भामट्याचा डाव
vasai rain latest marathi news
पहिल्या पावसाचे वसईत दोन बळी, समुद्रात बुडून आणि विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
vasai Potholes on Mumbai ahmedabad National Highway
वसई: राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, काँग्रेसने खानिवडे टोल नाका बंद पाडला

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण समजले नसून या आगीत पूर्णतः हॉटेल जळून खाक झाले आहे. या पोलीस यंत्रणा, महापालिका , अग्निशमन दल यांच्या मार्फत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.