वसई- विरारच्या हार्दिक पाटील याने अमेरिकेत झालेली अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा ही विक्रमी वेळेत पूर्ण करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. ३१ तास ४६ मिनिटांंत त्याने ही तीन दिवसांतील स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक १९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दरवर्षी अमेरिकेत अल्ट्रामॅन स्पर्धा ही ३ दिवस आयोजित केली जाते. त्यात १० किलोमीटर जलतरण, ४२० किलोमीटर सायकलींग आणि ८५ किलोमीटर धावण्याचा समावेश असतो. या स्पर्धेत दिवसाला १२ तासा प्रमाणे खेळाडूंना ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यंदाची स्पर्धा ९ ते ११ फेब्रुवारी या कालवाधीत अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात पार पडली. या स्पर्धेत १७ देशातील ४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात ६ भारतीय स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील केवळ ४ स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले. हार्दीक पाटील याने ३१ तास ४६ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.

हेही वाचा – भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

हेही वाचा – विरार पोलिसांचे कोंबिग ऑपरेशन, अपहृत मुलीची पोलिसांनी केली सुटका

..असा केला विक्रम

हार्दिकेने पहिल्या दिवशी ४ तास ५ मिनिटांत स्विमिंग आणि ५ तास २० मिनिटांत १४५ किलोमीटर सायकलींग पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी १० तास ४५ मिनिटांता २७५ किलोमीटर सायकलींग तर तिसऱ्या दिवशी ११ तास १० मिनिटांत ८५ किलोमीटर धावण्याचे अंतर पार केले. तीन दिवसांत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. स्पर्धेच्या इतिसाहात आतापर्यंत केवळ १८ भारतीयांनीच ही स्पर्धी पूर्ण केली होती. यापूर्वी हार्दीकने जगभरात आर्यनमॅन स्पर्धा तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक विक्रमांची नोंद केली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ८ वेळा, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये ४ वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ६ वेळा नोंद केली आहे.