वसई- विरार पोलिसांनी सुरू केलेल्या कोंबिग ऑपरेशनमध्ये अनपेक्षितपणे गुजरातवरून पळवून आणलेल्या एका मुलीची सुटका करण्यात आली असून घर सोडून पळून आलेल्या तरुणाचाही शोध लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात कोंबिग ऑपरेशन करण्यात येत आहे. विरार पोलिसांच्या विशेष पथकातर्फे कोंबिग ऑपरेशन करण्यात येत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबहे ट्रेनमधून जात असताना एक जोडपे संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता त्या तरुणाने गुजरातमधून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणले होते. याबाबत गुजरात राज्याच्या सुरत येथील कापूरदरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी मुलीची सुटका करून तरुणाला अटक केली आहे. कोंबिग ऑपरेशन सुरू असताना एक तरुण संशयास्पदरित्या पळून जात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता तो सुरत येथून घर सोडून आल्याचे समजले. या तरुणाची समजूत काढून त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही वाचा – वसई : मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ, बंदीनंतर काही बोटी रवाना

हेही वाचा – भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

या कारवाईत शहरातील हॉटेल्स, लॉजेस तपासले जात आहे. अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात असून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोंबिग ऑपरेशन राबविण्यात येत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation by virar police the kidnapped girl was rescued by the police ssb