आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी खरी गरज असते आíथक उत्पन्नाची, नोकरी-व्यवसायाची. आपल्या दिनचय्रेत कामांचे ८ तास गृहीत धरल्यास शिल्लक राहिलेल्या वेळेत सुमारे ७ ते ८ तास ज्या ठिकाणी आपण व्यतीत करतो ती जागा म्हणजे शयनगृह. अपेक्षा असते काम आणि विसाव्याची. ज्याचा संबंध असतो थेट मानसिकतेशी.
दैनंदिन गरजांची पूर्तता करत असताना सुख आणि समाधान हे मिळतेदेखील. पण त्याहीबरोबर आपल्याला गरज असते मन:शांतीची. आपल्या घराचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात; आणि हे तीनही विभाग आपल्या प्रमुख तीन गरजांशी पूरक असतात. यापकी अन्नाची गरज स्वयंपाकघरात भागवली जाते. वस्त्राची गरज शयनगृहाशी संबंधित असते, तर निवारा संपूर्ण घरात प्राप्त होणे अपेक्षित असते. प्रथम दोन गरजांमध्ये त्यांची पूर्तता करण्यासाठी विविध वस्तूंची आपल्याला गरज भासत असते आणि या वस्तू ठेवण्यासाठी काही विशिष्ट स्वरूपाचे फíनचर व संबंधित सोयी-सुविधा उपलब्ध कराव्या लागतात. शयनगृहाशी संबंधित फíनचर तसेच इतर अंतर्गत सजावट याचा विचार केला तर या ठिकाणी स्वयंपाकघराच्या तुलनेने अधिक जागा उपलब्ध असल्याने अंतर्गत संरचना करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
शयनगृहाच्या संरचनेचा विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने झोपण्याचा पलंग, कपडय़ांचे कपाट, ड्रेसिंग टेबल या फíनचरची नितांत गरज असते. या फíनचरमध्ये सर्वाधिक सोयी-सुविधा कपडय़ांच्या कपाटाच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाऊ शकतात. बदलत जाणारे जीवनमान, वाढत्या गरजा, वेळेचा अभाव, व्यक्तिमत्त्वातील भिन्नता, या बाबींमुळे शयनगृहातील कपडय़ांच्या कपाटाची संरचना ही व्यक्तीनुरूप असावी लागते. नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यावसायिक धर्तीवर बनवलेले कपडे, दैनंदिन वापरातील कपडे, क्रीडा-खेळ यासाठी वापरले जाणारे कपडे, लग्नकार्य, कार्यक्रम यासाठी ठेवणीतले कपडे, झोपताना वापरले जाणारे कपडे, हवामानातील बदलांप्रमाणे वापरले जाणारे कपडे, असे विविध प्रकारचे कपडे ठेवण्यासाठी लागणारे कपडय़ांचे कपाट आणि त्याची संरचना तसेच कपाटाची अंतर्गत रचना ही विचारात घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे एका शयनगृहात किमान दोन व्यक्तींसाठी कपाटांची सोय करणे अभिप्रेत असते. त्यामध्ये पती-पत्नी, बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, आजी-आजोबा आणि पाहुणे-रावळे अशा जोडय़ांचा विचार कपडय़ांच्या कपाटाची अंतर्गत रचना करताना करावा लागतो. त्या कपडय़ांच्या कपाटात प्रामुख्याने ठेवल्या जाणाऱ्या कपडय़ांच्या बाबतीत ते कसे, कोठे, कशा प्रकारे ठेवले जावेत अथवा ठेवण्याची सुविधा उपलब्ध असावी, हे विचारात घेऊन कपाटाची अंतर्गत संरचना साकारावी लागते.
प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या आवडीप्रमाणे कपडय़ांची निवड केलेली असते. त्याला अनुसरून संरचना साकारावी लागते. स्त्री आणि पुरुष असा भेदाभेद करायचा नाही, असे जरी म्हटले तरीही त्यांचे पेहराव, निरनिराळय़ा प्रकारचे कपडे यांची सुविधा, त्याचे विविध आकार व आकारमान हे भिन्न स्वरूपाचे असते. पुरुषांच्या कपडय़ांमध्ये सहसा वापरले जाणारे कपडे आणि नेहमीतले कपडे हे अनेकदा एकावर एक घडय़ा घालून ठेवणे पसंत केले जाते, तर स्त्रियांचे कपडे निराळय़ा कपाटात हँगरला अडकवून, लटकवून ठेवणे पसंत केले जाते. शयनगृहाच्या कपडय़ाच्या कपाटात कपडय़ांव्यतिरिक्त इमिटेशन, ज्वेलरीसाठी बॅग्ज, बँगल बॉक्सेस, काही प्रमाणात कॉस्मेटिक्स, उच्च प्रतीचे फुटवेअर अशा अनेक वस्तू एका निश्चित जागी ठेवून त्या नेमक्या वेळी मिळाव्यात अशी सोय-सुविधा विशेषत: स्त्रियांसाठी बनवल्या जाणाऱ्या कपडय़ाच्या कपाटात करावी लागते. स्त्रियांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय म्हणजे मॅचिंग. त्यांच्या पेहरावाला मॅच होऊ शकेल अशी ज्वेलरी, फुटवेअर, पस्रेस आणि इतर अ‍ॅक्सेसरीज यांची निश्चित जागा कपडय़ाच्या कपाटाच्या अंतर्गत संरचनेचे काम करताना ठरवावी लागते. या व्यवस्थेत प्रत्येक वस्तूची जागा निवडताना हवामानानुसार आवश्यक असणाऱ्या आणि वापरल्या जाणाऱ्या वस्तू कपाटात कोठे, कधी व कशा ठेवाव्यात, याचाही विचार सखोलपणे करावा लागतो.
हवामानातल्या तीनही ऋतूंमध्ये हिवाळा आणि उन्हाळा असताना वापराव्या लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी एकत्रितपणे ठेवल्या तरी चालू शकतात. यामध्ये उन्हाळय़ात वापरले जाणारे कपडे हे आकार, आकारमान, वजन या सर्वच दृष्टीने लहान असतात. याउलट हिवाळय़ातल्या कपडय़ांना ठेवण्यासाठी जागा जास्त लागते. त्यांचे वजन जास्त असते आणि तुलनेने वापरही कमी असतो.
अनेकदा आपल्या घरांमध्ये आठवणीतल्या साठवणींसाठी काही सोय करावी लागते. ही सोय करत असताना कौटुंबिक कार्यक्रमाच्या फोटोंचे अल्बम, शैक्षणिक तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे, छोटय़ा आकारातले काही प्रमाणात नित्याच्या वापरातले दागिने, सण-कार्यक्रमानिमित्त मिळालेल्या भेटवस्तू अशाही असंख्य बाबींचा विचार या कपाटाची अंतर्गत रचना करताना करावा लागतो. स्त्रियांच्या बाबतीत हेअर पिन्सपासून साडी बॅगपर्यंत, तर पुरुषांच्या बाबतीत टाय पिन आणि कफिलगपासून ब्लेझर आणि ओव्हरकोटपर्यंत वैविध्यपूर्ण निरनिराळय़ा आकाराच्या वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागते. यामध्ये आकार, आकारमान आणि त्या-त्या वस्तू ठेवण्याची योग्य पद्धत हे सर्वच महत्त्वाचे असते. आपण जेव्हा हौसेला मोल नाही, असे म्हणतो तेव्हा सर्वात अगोदर प्राधान्य देतो ते आपल्या कपडय़ांच्या निवडीला. ही निवड करत असताना आपण नेहमीच सवड काढून आपल्या आवडीच्या कपडय़ांना पसंती देतो. या ठिकाणी आवड-निवड आणि सवड या गोष्टींना जे आणि जसे महत्त्व देतो तेवढेच महत्त्व त्या वस्तू ठेवण्याच्या कपडय़ाच्या कपाटाच्या बाबतीतदेखील आवश्यक असते. आपल्याजवळ काय नाही, असा विचार करतानाच आपल्याकडे काय आहे ते या कपाटाच्या संरचनेसाठी महत्त्वाचे ठरते.
मौल्यवान वस्तू तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू या कपाटात ठेवत असताना त्या सर्वच वस्तूंचा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रमाने विचार व्हावा लागतो. यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे जितके महत्त्वाचे असते तितकेच शयनगृहातील कपाटाचे स्थानही योग्य असावे लागते. केवळ जागा आहे म्हणून कपाटासाठी ती जागा निश्चित न करता दारे-खिडक्यांमधून बाहेरच्या व्यक्तींना सहजासहजी ते दिसणार नाही आणि त्यामुळे त्यातील वस्तू अधिक सुरक्षित राहतील अशी जागा निश्चित करणे योग्य ठरते.
शैलेश कुलकर्णी – sfoursolutions1985@gmail.com
इंटिरीअर डिझायनर

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…