संपदा वागळे waglesampada@gmail.com 

ज्यां  चं जीवन हाच एक संदेश आहे,

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

अशा महात्मा गांधींना एकदा

कोणीसं विचारलं की, कुठलं घर चांगलं? यावर त्यांचं उत्तर होतं- आजूबाजूच्या

५ मलांच्या परिघात मिळणाऱ्या वस्तूंनी जे घर बनतं ते सर्वात उत्तम. कारण त्यामुळे स्थानिक लोकांना काम मिळतं. नेमका हाच विचार डॉक्टर माधव रेगे यांचं पेणजवळील रामराज या गावातील (ग्रामपंचायत- तरणखोप) घर बांधताना आचरणात आणलेला दिसतो.

डॉ. रेगे हे पक्के ठाणेकर, जन्माने आणि कर्मानेही. त्यांच्या लहानपणीचं म्हणजे साठ वर्षांपूर्वीचं दिवाबत्तीचं ठाणं आणि या गावातील त्यांचं सारवलेलं कौलारू घर ही त्यांच्या मर्मबंधातील ठेव. म्हणूनच मनात घर केलेलं ‘घर’ बांधण्याचा विचार कृतीत आणायची वेळ आली तेव्हा त्यांनी जागा निवडण्यापासून ते घर उभं राहीपर्यंत प्रत्येक पायरीवर याच जाणिवा वास्तवात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

पेण खोपोली फाटय़ापासून दीड किलोमीटर आत असलेल्या रामराज गावातील दहा गुंठय़ांच्या एका प्लॉटने त्यांच्या जागानिवडीबाबतच्या बहुतेक अपेक्षा पूर्ण केल्या. म्हणजे सीआर झोनमध्ये असल्याने आजूबाजूला मोठी इमारत होण्याची सुतराम शक्यता नाही. झालंच तर मनुष्यवस्तीपासून दूर, तरीही एका राहत्या घराची सोबत आणि वर बोनस म्हणजे नजर जाईल तिकडे हिरवेगार डोंगरच डोंगर. थोडक्यात, सोने पे सुहागा!

ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली. डॉक्टरांचं सुदैव म्हणजे जागा पसंत झाल्यावर त्यांना त्यांच्यासारखाच एक निसर्गवेडा आर्किटेक्ट भेटला. शार्दूल पाटील त्याचं नाव. शार्दूलचं कौतुक यासाठी की, आपल्या डिझाईन जत्रा या चारच वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या फर्मच्या माध्यमातून तो फक्त  पर्यावरणपूरक घरं उभारतो. डॉक्टर रेगे यांचं घर हे डिझाईन जत्राचं आठवं अपत्य.

आत्ता कोणाला खरं वाटणार नाही, पण तीन वर्षांपूर्वी जेव्हा प्लॉट ताब्यात आला तेव्हा ही उतारावरील जागा पूर्णपणे निष्पर्ण होती. सर्वत्र फक्त मुरूम आणि मुरूम. जाणकारांचं म्हणणं पडलं की, या जमिनीत काही लावण्यापूर्वी तिची मशागत करायला हवी.. तिला ओंजारून गोंजारून सिद्ध करायला हवं. हे ऐकत असतानाच डॉक्टरांनी सहज म्हणून एक मूठभर तूर उभ्या उभ्या तिथे  टाकली. (हो टाकलीच, पेरली नव्हे) आणि काय आश्चर्य! एक-दोन महिन्यांतच रोपं तरारून वर आली. मातीने ग्रीन सिग्नल दिला आणि मंडळी आनंदाने कामाला लागली.

शेजारी राहणाऱ्या पाटीलबंधूंच्या मदतीने डॉक्टरांनी प्रथम तुरीचंच शेत लावलं. तूर व नाचणी ही कमी पाण्यावर (दवावरच म्हणा ना) जगणारी जमात. शिवाय तुरीचं रोप जमिनीतील नायट्रोजन धरून ठेवण्याचं (फिक्सेशन) काम करतं. त्यामुळे शेजारचं झाडही बाळसं धरतं. इति डॉक्टर रेगे.  प्रक्रिया न केलेल्या अशा घरच्या तुरीचं वरण म्हणजे अमृत.. असंही ते म्हणाले.

झाड लावतानाही ज्यांच्यावर किडे, पक्षी येत नाहीत अशी झाडं म्हणजे गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी.. लावायची नाहीत हे निश्चित होतं. विचारपूर्वक निवडलेली साठेक मोठी झाडं इथे वाढताहेत, डोलताहेत. आंबा, पपई, पपनस, चिकू, डािळब, सीताफळ, बर्ड चेरी, अ‍ॅपल बोर.. अशा फळझाडांबरोबर सुरंगी, बकुळ.. अशी फुलझाडं, शिवाय बदाम, बहावा.. असे स्वत:चा आब राखणारे वृक्ष यांनी ही बाग समृद्ध बनलीय. कुंपणावर बोगनवेलही फुलून आलीय. झालंच तर मधल्या जागेत वांगी, कारली, चवळी, शिराळी.. अशा हंगामी भाज्याही लावल्या जातात.

निसर्ग घरात आणायचा म्हटलं की त्याबरोबर त्याचे वारकरीही येणार. या न्यायाला अनुसरून मुंगूस, साप, िवचू, बाऊल (मांजर वर्गातील एक मोठा प्राणी) हे मधूनमधून दर्शन देतात; पण त्यांच्या वाटय़ाला गेलं नाही तर तेही आपल्या वाटेला जात नाहीत.

बागेत येणारे पक्षी, प्राणी यांच्याशी जुळलेलं मत्र उलगडताना डॉक्टर म्हणाले, ‘‘पक्षी यावेत म्हणून आम्ही बर्ड चेरी हे झाड मुद्दाम लावलं. आज हे झाड छोटय़ा छोटय़ा लाल-काळ्या चेरींनी फुलून गेलंय आणि त्यांच्या मोहाने इंडियन रॉबिनची एक जोडी व चिमुकल्या सन बर्डच्या ३/४ जोडय़ा आमच्या बागेत मुक्काम ठोकून आहेत. मात्र खारी फार उच्छाद मांडतात. अ‍ॅपल बोर, पपई या फळांवर तुटून पडतात. त्यांचं देणं दिलं की उरलेला वाटा आमचा, तोही ठाण्याला नेऊन याला त्याला वाटण्यासाठी!

या घराच्या आसपास एक शेजारचं घर सोडलं तर दुसरं एकही घर दिसत नाही. दूर डोंगरावर आदिवासींचे पाडे तेवढे नजरेस पडतात. याचं कारण विचारल्यावर कळलं की, ट्रक येऊ शकेल एवढा रस्ता नसल्यानं अशा अडनिडय़ा जागी बांधकाम साहित्य आणायचं कसं, हा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची कमतरता. यामुळे सगळे प्लॉट विकले जाऊनही अजूनपर्यंत अन्य कोणीही इथे घर बांधण्यासाठी धजावलेलं नाही, पण डॉक्टरांच्या नशिबाने या दोन्ही प्रश्नांना उत्तर मिळालं. बांधकाम साहित्य आणि कामगार यासाठी गांधीजींच्या तत्त्वाचे पालन आणि बोअरवेलला लागलेलं उदंड पाणी यामुळे त्यांचा मार्ग सुकर झाला. मात्र बोअरवेलला मुबलक पाणी असूनही ठिबक सिंचन आणि रेन हार्वेिस्टग या दोन्ही पद्धतीने पाण्याचा जराही अपव्यय होऊ नये याची खबरदारी इथे घेतलेली दिसते.

घर बांधताना उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे उताराच्या बाजूने आधारासाठी एक दगडाची भिंत (रिटेन्शन वॉल) उभी करण्यात आली आणि त्याला लागून पुढचं बांधकाम. ही दगडी भिंत आतून पाहतानाही मनाला लोभवते.

प्रथम पडवी, नंतर एक पायरी, वर हॉल व किचन एकत्र आणि वर एक बेडरूम अशा तीन पातळ्यांत घराची रचना केल्याने वरच्या लालचुटुक कौलांचे एकमेकांना लगटून बसलेले तीन डोंगर बाहेरून पाहणाऱ्याला प्रथमदर्शनीच प्रेमात पाडतात. घरात पाऊल टाकताच लक्ष वेधून घेते ती चापूनचोपून सारवलेली पडवी. खरं तर डॉक्टरांना सगळ्या घरालाच सारवलेली जमीन हवी होती; पण अशा जमिनीवर सतत चाललं नाही तर मुंग्या, उंदीर ती भुसभुशीत करतात हे कळल्यावर त्यांनी आपली हौस पडवीपुरती मर्यादित ठेवली. पडवीच्या समोरील दोन्ही बाजूंना आसन या झाडाच्या लाकडाचे हत्तीच्या पायाएवढे गोलमटोल खांब लावलेत आणि बाजूंनी बांबूचे कठडे. या जागी मांडलेल्या खुर्च्यात बसून, चहा पीत पीत आसपासचा निसर्ग न्याहाळताना ब्रह्मनंदी टाळी न लागली तरच नवल!

‘झाडे वाचवा, झाडे जगवा’ हे ब्रीद असल्याने या घरात फर्निचर नाही. घरातील दोन-तीन बठका म्हणजे भिंतींचं एक्सटेन्शन. सामान ठेवायला भिंतींमध्ये कोनाडे. टी.व्ही., फ्रिजची तर इथे गरजच नाही. येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून इन्व्हर्टर आणि माइक्रोवेव्ह तेवढा आहे. खिडक्याही बांबूंच्याच. त्यांना आधार देण्यासाठी जे लाकूड वापरलंय ते सॉ मिलमध्ये निरुपयोगी म्हणून बाजूला काढलेल्यांपैकी. टांगलेल्या दिव्यांच्या शेड्स.. बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्याचा कठडा व त्याखालची नक्षी सगळीकडे (गावात मिळणारा) बांबूच बांबू!

बेडरूममधील पूर्वेकडच्या खिडकीतील दगडाची बैठक पाहून वाटलं की, हातात आवडत्या लेखकाचं पुस्तक असावं आणि गार वारा खात खात इथेच समाधी लागावी आणि खालच्या रातराणीने आपल्या सुगंधाने हळुवार जागं करेपर्यंत कोणीही उठवू नये.

या घरातलं न्हाणीघर (बाथरूम नव्हे) तर एकदम राजेशाही. भिंतीलगत जो दगडी प्लॅटफॉर्म आहे त्यावर बसून स्नान करा वा झोपून.. तुमची मर्जी! अशी मज्जा शहरात थोडीच अनुभवणार?

या घराची ताकद आणि वेगळेपण याचं गुपित त्याच्या प्लास्टिरगमध्ये दडलंय. बांधकामात स्टील आणि सिमेंट वापरायचं नाही हे आधीच ठरलं होतं. त्याऐवजी इथे जिवंत माती (उपयोगी जिवाणू असलेली), खडीचा चुना, गूळ, शेण आणि भाताचं तूस यांचं एकजिनसी मिश्रण प्लॅस्टर म्हणून वापरलंय. (पेशवेकालीन वाडय़ाच्या भिंती लिंपण्यासाठी हे वापरले जात असे, असे म्हणतात.) यातील भाताचं तूस हे सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतं. या प्रकारे प्लास्टर करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यासाठी आधी हे मिश्रण दोन दिवस भिजवून चांगलं तुडवावं लागतं. विटांवर लावल्यावरही ते सुकण्यासाठी दोन दिवस लागतात. मात्र या बांधकामासाठी पाणी मारावं लागतं नाही. अर्थात ही सर्व पद्धत कामगारांना शिकवावी लागली. शार्दूलचं म्हणणं असं की..  या प्रकारे घर उभं करायला थोडा जास्त वेळ लागतो; पण ते निश्चितपणे जास्त टिकाऊ असतं. शिवाय आतील तापमान कायम २ डिग्री कमी राहतं हा आणखी एक फायदा.. शार्दूलने वर्णिलेल्या त्या सुखद गारव्याचा अनुभव मीही घेतला.

हे घर झाल्यापासून म्हणजे गेल्या अडीच वर्षांपासून दर तीन महिन्यांनी आर्किटेक्टचे विद्यार्थी या प्रोजेक्टचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात आणि एक रात्र राहून भरपूर शुद्ध हवा घेऊन ताजेतवाने होऊन परततात.

सध्या डॉक्टर रेगे ठाण्यात कार्यमग्न असल्यामुळे या घराची व्यवस्था शेजारच्या पाटीलबंधूंकडे आहे; पण वैद्यकीय व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर या शेतघरात राहून आजूबाजूच्या पाडय़ावरील आदिवासींना रुग्णसेवा देण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. ते म्हणतात- बिनिभतींची उघडी शाळा लाखो इथले गुरू झाडे- वेली, पशुपाखरे यांची मैत्री करू.. ही कविता फक्त मुखोद्गत करण्यासाठी नाही, तर निसर्गाची ही माया अनुभवण्यासाठी आहे. या नजरेतून त्यांनी आपल्या या घराला ठेवलेलं ‘आभाळमाया’ हे नाव किती सार्थ वाटतं नाही?