करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. यात पुणेकरही मागे नाहीत. करोना संकटाच्या काळात पिंपरीतील शंकर कुराडे या हौशी व्यक्तीने जवळपास तीन लाख रुपये खर्च करुन सोन्याचा मास्क केला आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी बनवलेला हा मास्क सध्या चर्चेचा विषय आहे.