घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचं बचावकार्य पूर्ण झालं आहे. मृतांचा आकडा १६वर पोहोचला असून ४२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरू होतं. आयुक्तांनी आज (१६ मे) घटनास्थळी जाऊन सर्व पाहणी केल्यानंतर याबाबतची माहिती दिली. तसंच होर्डिंग्जबाबत कोणती खबरदारी घेण्यात यावी, याबाबतही ते बोलले आहेत.