Mumbai Mill Workers House Issue Explained By Loksatta: मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारा गिरणी कामगार १९८२ मधील संपानंतर उद्ध्वस्त झाला. उद्ध्वस्त झालेल्या या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पुनर्वसनासाठी गिरण्यांच्या जागेवर घरे देण्याचा निर्णय घेतला. पण आता २०२५ पर्यंतही गिरणी कामगार कुटुंबासह आपल्या हक्काच्या घरासाठी झगडताना दिसत आहे. खरंतर यापूर्वीच गिरण्याच्या जागेवर घरे बांधण्याची आणि घरांचे वितरण सोडतीद्वारे करण्याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळावर टाकण्यात आली होती.मात्र सगळी जुळवाजुळव करूनही मुंबईत एकूण केवळ २५ हजार गिरणी कामगारांच राज्य सरकार हक्काचे घर देऊ शकत आहे. पण उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या मागणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसह गिरणी कामगार संघटनांची एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नेमके काय निर्णय झाले व गिरणी कामगारांना घरे मिळण्यात नेमक्या काय अडचणी येत आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.