‘कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यात एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्यास मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे एक लाख रुपये देईन.’ तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विधिमंडळात ही घोषणा केली आणि त्या वर्षी त्यांना खरोखरच अशी मदत द्यावी लागली. १८ वर्षे झाली त्या घटनेला.

आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्याचे नाव होते नाना अजाबराव ठाकरे. वय अवघे ३२ वर्षे. राहणार किन्ही वळगी, जि. यवतमाळ. २७ मार्च १९९८ रोजी त्याने यवतमाळजवळील पिंपळगाव येथे गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण होते कर्जबाजारीपणा.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

ही घटना विधिमंडळात गाजली. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना सरकारने एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी लावून धरली. शेतकरी आत्महत्या प्रश्नाचा राजकीय धुरळा राज्यभर उडाला. अखेर सरकारने समिती नेमली. तिच्या चौकशीत ही आत्महत्या कर्जबाजारीपणामुळेच झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कुटुंबीयांना सरकारने एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी शिफारस समितीने केली. तेव्हा स्वत: मुख्यमंत्री मनोहर जोशी ४ मे १९९८ रोजी किन्ही वळगी येथे हेलिकॉप्टरने गेले. एक लाखांचा धनादेश त्यांनी नानाची पत्नी इंदू हिला दिला. त्या वेळी त्यांनी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला विहीर, वीजपंप, घर, कुटुंबातील एकाला नोकरी अशी बरीच आश्वासने दिली. त्यांना एक झोपडीवजा घरकुल बांधून दिले सरकारने. बाकी आश्वासने अजून पूर्ण व्हायची आहेत.

money-issue-chart

‘त्या’ एक लाखातून मुलीचे लग्न झाले. पसा उरला नाही. पसा रिता होता तो रिताच राहिला. पुढे इंदू ठाकरे हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आज त्यांच्या वसंत आणि वासुदेव या दोन मुलांकडे एक एकर शेती आणि एक गाय आहे. मोलमजुरीवर त्यांचा संसार सुरू आहे. १९९८ मध्ये त्यांच्या वडिलांची जी स्थिती होती त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती आज या मुलांची आहे. शेतात पिकत नाही आणि पिकलेल्याला भाव नाही, ही त्यांची व्यथा आहे आणि ती सार्वत्रिक आहे..

या कहाणीचे तात्पर्य आहे – आत्महत्याग्रस्त कुटुंबाला काही लाखांची मदत केली म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती सुधारतेच असे नाही. त्यासाठी आणखीही काही करणे आवश्यक आहे..