दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com

केवळ पारंपरिक शेती करण्याबरोबरच आता कृषीपूरक व्यवसायांकडेही शेतकरी मोठय़ा संख्येने वळू लागले आहेत. यामध्ये सर्वात कमी भांडवल आणि जागा लागणारा व्यवसाय म्हणून मधमाशीपालनाची ओळख आहे. याच शेतीपूरक व्यवसायाबद्दल..

titwala farmer death marathi news
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

कोल्हापूर म्हटले की उसाची गोड शेती डोळ्यासमोर येते. याच गोडव्यात आणखी एक मधुर भर घालणारी शेती वाढत आहे ती मधाची. मधमाशी पालनाच्या गोडव्याची झपाटय़ाने भर पडत चालली आहे. शुद्ध मध निर्मितीला येथे पोषक वातावरण निसर्गत: उपलब्ध आहे.आहार शास्त्रात आणि आयुर्वेदात विशेष उल्लेख केलेल्या मधाची शास्त्रशुद्ध निगराणी केली जात आहे. यातील काही शेतकऱ्यांनी या गोडव्याचा आनंद इतरांनाही देऊ  केला दिला आहे.

निसर्गाच्या नाना तऱ्हांना सोबत घेत शेती करावी लागते. निसर्ग अनुकूल असेल तर शेतीचा गोडवा पाहायला मिळतो. तोच प्रतिकूल परिस्थितीत बंदलला की आर्थिक अनिश्चितता समोर येते. वेगवेगळ्या अडचणींची मालिका निर्माण होते. यासाठी शेती पूरक व्यवसाय केला जावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातून अलीकडच्या काळात स्वावलंबी, स्वाभिमानी, कर्जमुक्त आणि स्वस्थ जीवन देणाऱ्या पूरक कृषी व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. त्यामध्ये मधमाशीपालन हा एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय बनला आहे. मधमाशीपालन जीवन कष्टदायक असले तरी ते शेतकऱ्यांना उपकारक ठरले आहे.

जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची प्राचीन परंपरा आहे. अलीकडे मधमाशी पालन व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे. मधमाशी ही फु लातील रसाला/परागाला रसात बदलत असते. त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. आहारशास्त्र आणि आयुर्वेदात मधाला विशेष महत्त्व आहे. ‘शुद्ध मधा’च्या उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मध सेवनाने आरोग्य उत्तम राहते. अत्यंत कमी भांडवली खर्च लागणारा मधमाशीपालन हा कृषिपूरक व्यवसाय अगदी कमी जागेतही करता येतो. दुसरीकडे पर्यावरणासाठीही हा व्यवसाय जास्त उपकारक ठरतो. मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव पडतो. परागीकरण करण्यासाठी मधमाश्या महत्त्वाची भूमिका पार पडतात. जगातील एकूण वनस्पतींपैकी बहुतांश  प्रजातींचे परागीभवन केवळ या मधमाश्या करत असतात. एकप्रकारे आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाचा सारा डोलारा सांभाळण्याचे काम या मधमाश्या करत असतात.

पृथ्वीतलावरील अमृत असे मधाचे वर्णन केले जाते. ए,बी,सी जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन याचा मधामध्ये समावेश असतो. भारत ही आयुर्वेदाची जन्म व कर्मभूमी असल्यामुळे मधाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. अलौकिक माधुर्य त्यामध्ये सामावलेले आहे. हल्ली मध ब्रेड स्प्रेड, जाम, केक, मिठाई, चॉकलेट, भाज्या व फळांचे सॅलेड यामध्ये वापरले जाते. अन्न टिकवणारा घटक म्हणूनही त्याचा वापर केला जातो. कोणतीही प्रक्रिया न केलेला शुद्ध मध महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी अधिक पैसे देण्याची जाणकार ग्राहकांची तयारी असते.

वाढती व्याप्ती

निसर्गात ठरावीक ऋतूनुसार झाडांना बहर येत असतो. त्यामुळे नैसर्गिक मधाचे उत्पादन देखील ऋतूनुसार होत असते. नैसर्गिक मधात कायम विविधता आढळून येते. याच कारणामुळे दरवेळी प्रत्येक ऋतूमधील फुलोऱ्यानुसार उपलब्ध झालेला मध हा वेगवेगळ्या रंगाचा, चवीचा, गंधाचा, स्वादाचा व घनतेचा असतो. प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर मध हा मधमाश्यांनी एकाच प्रकारच्या फुलोऱ्यापासून बनवला आहे की अनेक प्रकारच्या फुलोऱ्यापासून तयार केला आहे हे ओळखणे शक्य झाले आहे.अशा या मधमाशी पालनात कोल्हापूरचे शेतकरी लक्षणीय प्रमाणात उतरले आहेत. इतिहासात डोकावले तर ५०—६०  वर्षांपासून मधमाशी पालन केले जाते. कोल्हापूरच्या पश्चिम भागाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्यद्रीच्या कुशीत विपुल जैवविविधता आहे. येथे मधमाशीपालन करणे अनुकूलआहे. पूर्वी अगदी मोजके शेतकरी हा व्यवसाय करायचे. अलीकडे प्रशिक्षण घेऊ न त्यामध्ये अनेकांनी नाव कमावले आहे. यातील करवीर तालुक्यातील कणेरी गावचे दयावान पाटील यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दयावान पाटील यांच्या घरी त्यांनी शिक्षण झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी घरच्या शेतीत लक्ष घातले. पण काहीतरी वेगळे करून दाखवावे असे त्यांच्या मनाने ठरवले. त्यातून मधमाशी पालनाचा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्धार केला. पुण्याच्या राष्ट्रीय मधमाशी प्रशिक्षण संस्थेत त्यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले. त्या ज्ञानाधारित गावच्या अडीच एकर जागेत शेती करता करता मधमाशी पालनाकडे लक्ष दिले. त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी कणेरी मठाचे काडसिद्धेश्व्र महाराजांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी या क्षेत्रात त्यांचा जम बसला नाही. स्थानिक मध उत्पादनही फारसे होत नव्हते. या भागात जंगल कमी असल्याने परागीकरणही कमी प्रमाणात होत असे. एका पेटीत फार तर अर्धा किलो मध उपलब्ध होत असे. पुढे त्यांनी हा व्यवसाय अधिक अभ्यासपूर्वक करायचे ठरवले. त्यासाठी सह्यद्रीच्या जंगलवाटा तुडवण्यास सुरुवात केली. राधानगरी, काळम्मावाडी या धरण परिसरात जंगलाचा भाग विपुल आहे. घनदाट जंगल परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता येथे मधमाशी पालन केले जात असल्याचे समजले. उत्पादनही चांगले येत असल्याचे समजल्यावर याच परिसरात त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. या भागात सुरुवातीला स्वत: निर्माण केलेल्या २० पेटय़ा बसवल्या. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान निसर्गात फुलोरा यायला सुरूवात होते. तेव्हा मधाचा हंगाम सुरू होतो. तो पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहतो.वेगवेगळे प्रयोग करीत आता त्यांनी ५० पेटय़ापर्यंत व्यवसाय वाढवला आहे. दरवर्षी सुमारे अडीचशे ते तीनशे किलो मध निर्मिती होते. ६०० रुपये किलो दराने त्याची विRी केली जाते. त्यासाठी त्यांनी ‘अलकनंदा हनी’ अशी नाममुद्रा तयार केली आहे. कोणतीही प्रRि या न करता नैसर्गिक मध विकण्यावर त्यांचा भर आहे. शासनाचे मधमाशी पालन व्यवसायाला केंद्र व राज्याचे खादी ग्रामोद्योग मंडळ, राज्याचे कृषी विभाग आणि आत्मा विभाग अशा चार ठिकाणाहून अनुदान मिळू शकते. मात्र त्यांनी अनुदान न घेता स्वबळावर हा व्यवसाय केला आहे.जिल्ह्यात सुमारे दीडशे शेतकरी हा व्यवसाय करतात. दहा-वीस पेटय़ांमध्ये पेटय़ा असणारे शेतकरी अधिक, तर ५० वा त्याहून अधिक पेटी असणारे मोजके आहेत. या सर्वाचा एकमेकांशी दूरध्वनीवरून संवाद होत असतो. व्यवसायातील अडचणींची चर्चा होऊ न त्यावर उपाययोजना सुचवल्या जातात.त्या आचरणात आणल्या जातात.

पालनातील धोके

मधमाशीपालन व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणला असला तरी त्यात कडवटतेचे काही अडथळे आहेत. त्यात प्रामुख्याने अस्वल. या जंगली प्राण्याचा उपद्रव मोठी डोकेदुखी आहे. निसर्गत: मधमाश्यांचा संचार कोठे आहे याचे आकलन असल्याने झाडावरील मधाच्या पोळ्या मटकावण्यात तो पटाईत आहे. मधमाशी पालनासाठी ठेवलेल्या पेटय़ा फोडून खाण्यातही आता तो सराईत झाला आहे. परिणामी अस्वलाचा संचार अधिक असलेल्या ठिकाणी मधमाशी पालन कमी प्रमाणात केले जाते. किंवा काही खास उपाययोजना केल्या जातात. रात्रीच्या वेळी दोरीला बॅटरी बांधणे, आग निर्माण करणे, मचाण बांधून रात्री मुक्कामाला जाणे अशा वेगवेगळ्या युक्त्या शेतकरी वापरत असतात. याशिवाय मोठय़ा मुंग्या (डोंगळे), सरडे, पाली, बहिरे पोपट यापासूनही मधमाश्यांना काही प्रमाणात धोका असतो.

मधातील वैविध्य!

मधाचे वेगवेगळे प्रकार असल्याचे दयावान पाटील सांगतात. उंच इमारती, वड —पिंपळ यासारखे वटवृक्ष यावर आग्या मोहोळ असतो. यापासून वर्षांकाठी १५ किलो मध मिळू शकतो. फु लोरा (फ्लोरिया) या प्रकारात कमी उंचीच्या झाडांवर मधमाश्यांचा संचार असतो. वर्षांकाठी सुमारे अडीचशे ग्रॅम मध यापासून मिळतो. तिसरा प्रकार हा ‘सातेरी’ नावाने ओळखला जातो. यामध्ये सलग सात ते आठ पोळ्या ओळीने असतात. ट्रायगोला अर्थात पोया हा आणखी एक प्रकार.  याच्या मधमाश्या डंख विरहित असतात; पण त्यापासून खूपच कमी म्हणजे अवघा शंभर ग्रॅम मध मिळत असतो. त्याच्यात औषधी गुणधर्म अधिक असल्याने त्याची किंमत हजार ते दोन हजार रुपये किलो अशी असते. पाचवा प्रकार हा पाळीव मधमाश्यांचा मानला जातो.त्याला ‘युरोपीय मधमाशी’ असेही म्हटले जाते. सूर्यफूल, मोहरी, बाजरी अशा मोठय़ा आकाराच्या शेतीमध्ये अशा प्रकारचे मधमाशी पालन केले जाते.

तरुणाईला प्रोत्साहन

मधमाशी पालन व्यवसायामध्ये नवी पिढी यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाटील यांनी अनेकांना या क्षेत्रात जाण्यासाठी उद्युक्त केले आहे.  यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. के. डी. जाधव यांचे प्रशिक्षण वर्ग त्यांनी आयोजित केले असून आत्तापर्यंत ४०० जणांनी प्रशिक्षण घेतले आहे. बऱ्याच लोकांनी २—३ पेटय़ा द्वारे मधमाशी पालनाला सुरुवात केली आहे. शाहूवाडी तालुक्यातील ज्ञानदेव पाटील, गणेश गायकवाड, मिणचे खुर्द येथील एस. डी. देसाई अशांनी क्षेत्रात आता चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यांच्या बोलण्यातून या व्यवसायाविषयी आशावाद दिसतो.या व्यवसायात नव्याने येणाऱ्यांना पाटील मोफत पेटय़ा पुरवत असतात. शेतकऱ्यांनी त्या न्यायच्या, व्यवसाय करायचा; मध काढून त्या परत आणून द्यायच्या इतकीच पूर्वअट. यातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागले असून त्यांच्या जीवनात गोडवा वाढीस लागला आहे