डिजिटल माध्यमातून खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण होताना दिसते. यात यूटय़ूबचा वापर जास्त होताना दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हृदयात शिरायचा मार्ग हा पोटातून जातो,’ असं म्हणतात. त्यामुळे कधी कोणाला इम्प्रेस करायला किंवा कधी आपल्याच जिभेचे चोचले पुरवायला किंवा एखादा चमचमीत दिसणारा पदार्थ खावासा वाटला की दर वेळी कुठे बाहेर जाऊन खाणार म्हणून मग पाय स्वयंपाकघराकडे वळतात पण पंचाईत होते ती योग्य पाककृती कशी करावी याची. पूर्वी परफेक्ट रेसिपीसाठी पाककृतीची पुस्तकं, आजी-आईने सांगितलेल्या पाककृती लिहून ठेवलेली वही याचा आधार होता किंवा एखादी रेसिपी फोनवरून विचारली जायची. आता तर यूटय़ूबवरच्या फूड व्हिडीओ चॅनेल्सनी सगळं कसं अगदीच सोप्पं करून टाकलंय. आपल्याला हवी असणारी कोणतीही रेसिपी, कितीही वाजता आपण पाहू शकतो व तशी करू शकतोय. तेही त्या त्या प्रकारच्या फूड एक्सपर्ट किंवा शेफकडून! जगातली कोणतीही पाककृती असो ती आपल्याला या व्हिडीओजच्या मदतीनं सहज करणं शक्य होतं.

केवळ शेफच नाहीत तर सुगरण गृहिणींना देखील यूटय़ूबमुळे त्यांच्या पाककृती जगभर पोहोचवता येत आहेत व आपली एक ओळख त्या यातून निर्माण करतायेत. यूटय़ूब चॅनलच्या माध्यमातून एक व्यवसायाची संधीही उपलब्ध होते. गरज असते ती नवनवीन पदार्थ  खवय्या रसिकांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याची!

काही यूटय़ूब फूड चॅनेलविषयी

  • ‘कबिताज किचन’ हे कबिता सिंग याचं फूड चॅनल लोकप्रिय आहेत. या माध्यमातून भारतीय पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात. १,५८२,६८३ इतके सबस्क्रायबर या चॅनलला आहेत.
  • प्रसिद्ध शेफ संजीव कपूर हे त्यांच्या रेसिपीजसाठी सर्वाना माहीत आहेतच. त्यांच्या फूड शोमुळे ते घरघरांत पोहोचले आहेतच. त्यांचं ‘संजीव कपूर खजाना’ हे फूड चॅनल असून त्याला १,४८५,५७२ इतके सबस्क्रायबर आहेत. भारतीय तसेच जगभरातील विविध रेसिपीज ते दाखवतात.
  • शेफ संजय थुम्मा याचं ‘वाह शेफ’ हे फूड चॅनेल केवळ त्यांच्या रेसिपीज नाही तर मजेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या सादरीकरणासाठीदेखील पाहिलं जातं. ९,८७,७२१ सबस्क्रायबर या चॅनेलला आहेत.
  • निशा मधुलिका या शाकाहारी रेसिपीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतात. २,१९०,४३७ इतके सबस्क्रायबर त्यांच्या चॅनलला आहेत.
  • मधुरा बाचल याचं ‘मधुराज रेसिपी’ला ४,७८,०८१ सबस्क्रायबर आहेत तर त्या भारतीय प्रादेशिक पाककृती दाखवतात.
  • मंजुला जैन याचं ‘मंजुलाज किचन’वरही भारतीय शाकाहारी पदार्थ दाखवले जातात. त्यांना ४,२७,८९० सबस्क्रायबर आहेत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food culture digital media youtube food channel
First published on: 23-06-2017 at 00:46 IST