परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. हे कसं साधायचं  या गोष्टींमधून हेच थोडं समजून घेऊ या.

अर्जुन जरा रिलक्टन्टलीच क्लिनिकमधे आला, आईनं आग्रह केला म्हणून. आमच्यात झालेल्या चर्चेचा हा सारांश..

Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

तो आजकाल सदा वैतागलेला, इरिटेटेड असतो. नाही तर डिप्रेस्ड तरी. उद्या एक वर्ष होईल त्याला ग्रॅज्युएट होऊन. जॉब मिळवण्यासाठी सगळी धडपड केली. अजूनही जॉब हुलकावणी देतोय. खूप सारी अ‍ॅप्लिकेशन्स करून झाली. काही ठिकाणी इंटरव्ह्य़ूही दिले. पण सगळीकडे नन्नाचा पाढा. ज्या काही ऑफर्स मिळाल्या त्यांना जवळजवळ फुकटातच काम करून हवं होतं. नोकरी नाही तर पुढे शिकावं असं म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या एन्ट्रन्स एक्झाम्सही दिल्या. त्याला कळत नाहीये अजून काय करावं ते.

सध्या अर्जुनचं रुटीन काय आहे? खरं तर त्याला रुटीन म्हणावं का हा प्रश्नच आहे. कारण सकाळी उठण्यापासून त्याचा दिवस बेशिस्त सुरू होतो. ‘जाऊ दे ना, काय करायचंय उठून?’ असा विचार येतो भल्या सकाळी मनात आणि त्याचा मूडच जातो. खूप यूजलेस, पर्पजलेस वाटतं. काही सेल्फ-एस्टीमच राहिलेलं नाही. मधूनमधून रिमार्क्‍स कानावर पडतात, ‘निदान वेळेवर उठावं तरी.. एक काम करेल तर शपथ! किती दिवस हे असं चालणार.. वगैरे वगैरे’. तो रूममधून बाहेर यायचं टाळतो. जवळजवळ सगळे मित्र भरपूर कमावताहेत. कधी सगळे एकत्र जमले की पूर्वीसारखं टपऱ्यांवर न जाता चांगल्या हॉटेल्समध्ये जायचं ठरतं. अर्जुनची पंचाईत होते. जावंसं तर वाटतंय, पण गेलं तर पैसे कुठून आणायचे? आधीच रोजच्या खर्चासाठी, पेट्रोलसाठी आई-बाबांपुढे हात पसरावे लागतात. त्यामुळे अर्जुन मित्रांबरोबर जायचंही शक्यतो टाळतो. मोबाइल, लॅपटॉप हेच मित्र आहेत सध्या.

कुणी भेटलं की तेच तेच प्रश्न विचारतात, सेटल कधी होणार? नोकरी का करत नाहीस? हे सेटल होणं म्हणजे काय? एकदाचं पटकन शिक्षण वगैरे उरकून पैसे कमवायला लागायचं आणि लग्न करायचं? फॅमिलीची, नातेवाईकांची इतकंच नव्हे तर आजूबाजूच्या अनोळखी लोकांचीही अपेक्षा हीच असते. प्रेशर असतं एक प्रकारचं सतत. आता असं झालंय की, तो स्वत:ही एका ठरावीक साच्यात अडकलाय अपेक्षांच्या. अगदी डेस्परेट झालाय. सध्या त्याला स्वत:चाच विश्वास वाटत नाहीये. आपल्याला काही जमेल का आयुष्यात करायला अशी शंका येतेय. स्वत:वर, परिस्थितीवर जो राग येतो तो निघतो इतरांवर, म्हणजे आईबाबांवर. गंमत असते नाही? जे लोक आपल्या सगळ्यात जवळचे असतात, आपली सर्वात जास्त काळजी करतात त्यांच्यावरच आपण सर्वात जास्त चिडचिड करतो. हक्क वाटतो आपला तो.

खरं तर एकीकडे त्याला असंही वाटतंय की अशी एक वर्ष उसंत हवीच होती. गिटार शिकायची, ट्रेक्सना जायचं, पुस्तकं वाचायची असं खूप काही करायचंय. पण आता पंचाईत अशी झालीय की त्यासाठी लागणारे पैसे? ते कुठून आणायचे?

अर्जुनचं बोलणं ऐकून नुकताच ऐकलेला एक शब्द आठवला – ‘क्वार्टर लाइफ क्रायसिस’. ‘मिडलाइफ’मध्ये येणारा क्रायसिस आता ग्रॅज्युएट झाल्या झाल्या यायला लागलाय. शिक्षण चालू असतं तोपर्यंत फक्त अभ्यास, मार्क्‍स मिळवणं, पास होणं इतपतच विचार असतात. मग एका सोनेरी क्षणी आपण ग्रॅज्युएट होतो. ‘एज्युकेशन इज द टिकेट टु जॉब’ असे सुविचार ऐकलेले असतात. आता शिकलो ना, मग मिळणारच जॉब अशी खात्री असते. त्या उत्साहानं नोकरीच्या शोधाला लागतो. हळूहळू एकएक अनुभव येतात. नोकऱ्या वाटतं तितक्या पटकन मिळत नाहीत. आपण ज्या क्षेत्रात शिकलो त्यात आधीच भरमसाट लोक आहेत हे कळतं. प्रत्येक ठिकाणी अनुभव, एक्स्पिरियन्स विचारतात. अरे, पण इतके दिवस तुम्हीच म्हणत होता ना शिका म्हणून? मग तो एक्स्पिरियन्स घ्यायची संधी कुठे दिलीत आम्हाला?

अर्जुन, हे गेलेलं सेल्फ एस्टीम मिळवायला काय बरं करता येईल तुला? अगदी प्रॉपर नोकरी नाही पण कमी पैसे मिळणारं काही तरी काम मिळू शकतं म्हणालास ना? तुला माहितेय, अशा कामांचा उपयोग ‘गेट वे’ म्हणून होतो. एकातून दुसर, त्यातून आणखी काही असं मिळत जाण्याची शक्यता तरी निर्माण होते. जेव्हा हे मिळेल ते काम आपण करतो तेव्हा त्या प्रत्येक अनुभवातून आपण शिकत जातो. तऱ्हेतऱ्हेच्या माणसांची, त्यांच्या स्वभावांची माहिती होते. इतकंच नव्हे तर आपण किती वेगवेगळ्या प्रकारांनी फसवले जाऊ शकतो हेही डोळे उघडणारं असतं. प्रत्येक काम ही एक अपॉच्र्युनिटी असते. त्यातून ओळखी होतात. आपण किती मनापासून, उत्साहानं हातातलं काम करतोय हे लोकांच्या लक्षात येतं. काही वेळा एखादं इंटरेस्िंटग, पॉझिटीव्ह कुणी तरी भेटतं. अशा व्यक्तींबरोबर नुसतं असणंसुद्धा पटकन काही तरी उपाय सुचवून जातं.

रोज सकाळी वेळेवर उठून, व्यायाम करून छान तयार झालास तर तुझ्या दिवसाची सुरुवात मस्त होईल असं नाही वाटत तुला? गाढ झोप, व्यायाम, खाण्यापिण्याच्या प्रॉपर वेळा, घरातली कामं, इतरांना मदत, जेन्यूईन मित्रांबरोबर वेळ घालवणं, मेडिटेशन, हॉबी.. किती तरी गोष्टी आहेत. तुझ्या मनाला, मेंदूला उत्साह देणाऱ्या. या सगळ्यामुळे जॉब मिळेल की नाही माहिती नाही, पण तुला तुझा पूर्वीचा ‘अर्जुन’ नक्की सापडेल.

निघताना अर्जुनचे डोळे चमकत होते. आशेनं? की डोळ्यांत आलेल्या पाण्यानं?

(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक असून किशोरवयीन मुलांच्या समस्यांविषयीच्या तज्ज्ञ आहेत.)

viva@expressindia.com