गायत्री हसबनीस

थंडी सुरू आहे त्यामुळे आता ओठांची काळजी घेतली पाहिजे. ओठ सतेज राहण्यासाठी आपण लिप बामला जवळ करतो त्यात काही नवीन नाहीच. थंडीत स्पेशल विंटर लिप बामही असतात. त्यामुळे थंडीत ओठ कोरडे पडले तरी काही काळजी नसतेच कारण आपल्याकडे लिप बाम आहेतच. ओठांवरची त्वचा कोरडी पडते म्हणून आपण जेल लिप बाम जास्तीत जास्त वापरतो. पण थंडीत ओठ कोरडे पडणे, पांढरे होणे आणि रूक्ष दिसणे यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे जेल, व्हॅसलिन याहून काही उपयुक्त असे लिप बाम आज बाजारात आले आहेत. त्याची माहिती घेऊन थंडीत लिप बामचे काही वेगळे पर्याय विशेष ब्रॅण्ड्सनी त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर एक नजर ..

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

* लिप बामचे वैशिष्टय़ असे की त्यांची साइज लहान असल्यामुळे आपण कुठेही आणि केव्हाही लिप बाम बॅगेत भरून विविध ओकेजनला, पार्टीला, ऑफिसला, कॉलेजला घेऊन जाऊ  शकतो. ‘व्हॅसलिन’ आणि ‘निव्या’सारखे प्रॉडक्ट अजूनही वापरले जातात. त्यांची किंमत कमी असते आणि तीन-चार साइज आणि किमतीत हे लीप बाम मिळतात. या वेळीही ४० रुपये एवढय़ा लहान साइजचे लीप बाम व्हॅसलिनने उपलब्ध करून दिले आहेत. ‘हिमायला’चा लिप बामसुद्धा ३० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. असे लिप बाम तुम्हाला टय़ूबमध्ये मिळतील तर लहान कस्टर (डबीमधले) लीप बामही विविध दरांत उपलब्ध आहेत. ‘हिमालया’कडून रिच कोको बटर १३४ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल तर पिच वाइन १३९ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहे. ‘व्हॅसलिन’मध्ये अ‍ॅलोवेरा, रोझ हे फ्लेवर आहेत जे ३० ते ५० रुपयांत मिळतील.

* ‘ओरिफ्लेम स्वीडन’चा रास्पबेरी फ्लेवरचा लिप बाम ३२९ रुपये एवढा आहे. ‘ब्लू हेवन’चा लिप बाम स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये ८५ रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय चेरी फ्लेवर ६५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. काही सस्टेनेबल प्रॉडक्ट्सचा तुम्ही विचार करावा कारण काही तरुणींना ‘व्हिटॅमिन’ची कमतरता असल्यास ओठ लवकर शोषले जातात, कोरडे पडतात, कधी रॅशेस आणि भेगा येतात त्यामुळे त्यासाठीचे ब्रॅण्ड्स आज बाजारात उपलब्ध असल्याने त्याचा वापर करता येऊ शकेल. ‘ऑर्गॅनिक हार्वेस्ट’ या ब्रॅण्डकडून ‘शिया बटर’ फ्लेवरचा लिप बाम बाजारात आला आहे. शिया बटरमधल्या गुणधर्मामुळे ओठांवरची त्वचा कोरडी होऊ न शोषली जात नाही. याच ब्रॅण्डकडून पोमोग्रेनेट जे ओठांसाठी चांगले असते त्या फ्लेवरमध्येही लिप बाम आहे. लेमन, लिली, हिबिस्कस, ग्रीन अ‍ॅपल, ग्रीन टी अशा ऑर्गॅनिक फ्लेवरच्या लिप बामचा उपयोग करून घेण्यासारखा आहे. यांची किंमत १५७ रुपयांपासून सुरू आहे. या ब्रॅण्डचा स्ट्रॉबेरी विथ शिया बटर हा फ्लेवर एक्स्ट्रा प्रोटेक्शनसह उपलब्ध असून त्याची किंमत १९९ रुपये इतकी आहे.

* विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स बाजारात जरी आले तरी वर म्हटल्याप्रमाणे, ‘निव्या’चे प्रॉडक्ट्स हे आजही सगळे वापरतातच. याचे कारण यात फ्लेवर जरी कमी असले तरी ते सगळ्यांना सूट होतात आणि सगळे ते खरेदीही करू शकतात. निव्यामध्ये शिया बटर आणि पॅथेनॉल असतेच ज्याने ओठ फुटत नाहीत आणि मॉइश्चर मिळते. ‘निव्या’तही चेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, वॉटरमेलन, सॉफ्ट रोझ या फळांच्या फ्लेवरसह मॉइष्चरायझर असते. यांची किंमत अनुक्रमे ९१, ९५, १२२, १२८, १३९ रुपये एवढी आहे. निव्या मेन अ‍ॅक्टिव्ह केअर लिप बामही ९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘वादी हर्बल्स’कडून विविध फ्लेवरच्या लिप बामचे पॅक्स मिळतील. यात प्रामुख्याने हनी, इलायची असे खास फ्लेवर आहेत. हे पॅक्स डय़ूएल, ट्रिपल आणि मल्टिपल पॅक्समध्ये आहेत. ४५ रुपयांपासून २१०, १७०, ३१४ रुपयांपर्यंत असे पॅक्स मिळतील.

* काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स यंदा बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. फॅशन ब्लॉगर्ससुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सना महत्त्व देत आहेत. ‘कामा’ या ब्रॅण्डकडून रोझ फ्लेवर असलेला आयुर्वेदिक लिप बाम उपलब्ध आहे, ५९५ रुपये एवढय़ा किमतीत हायस्पीड लिप बामही मिळेल. ‘खादी’ या आयुर्वेदिक ब्रॅण्डकडून वॉटरमेलन आणि रोझ मिक्स फ्लेवर उपलब्ध आहे, २०० रुपयांपासून यांची किंमत आहे. ‘बायोटिक’चा बायो फूड १७५ रुपये आणि बायो नेक्टर हा १४९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

* सगळ्यांच्या आवडीच्या ‘बेबी लिप्स’ला तर तोडच नाही. या वेळी ‘मेबिलिन’च्या बेबी लिप्समध्ये ‘पिंक लॉलिटा’, ‘बेरी क्रश’, ‘पीच ब्लूम’, ‘पिंक ब्लूम’ हे लिप बाम हटके ठरले आहेत. त्यांची किंमत १३९, १८५, १७५ रुपये अशी आहे. यात लिप बाम स्टिक आहेत. ‘कॅण्डी वाव्ह’, ‘ब्राइट आऊट लाऊड’ असे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. १७५, १९९, २८५, १५१, १२४ रुपये एवढय़ा किमतीत हे स्टिक्स मिळतील. ‘मेबिलिन’चे काही स्पेशल लिप बामही आहेत. ‘आलिया लव्ह्ज एनवाय’ या नावाचा लिप बाम ३४५ रुपयांत मिळेल.

* ‘लोटस’कडून फ्रुट फ्लेव्हरचे लिप बाम १५० ते ३०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ‘नायका’कडून मॅक्रोन लिप बाम २४९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘एवेने’चा क्लोड क्रीम लिप बाम २,२४५ रुपये एवढय़ा दरात असून लिप ग्लॉसला पर्याय म्हणून तुम्ही याचा वापर करून घेऊ  शकता. ‘एवॉन नॅचरल्स’ किंवा ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ या ब्रॅण्डकडून हलके लिप बामही आले आहेत. १०० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे.

या लिप बामवर मोठय़ा प्रमाणावर सवलती फारशा नाहीत मग तुम्ही २० टक्के सूट असलेले प्रॉडक्ट्सही घेऊ  शकता. छोटय़ातल्या छोटय़ा ब्रॅण्डपासून मोठय़ा ब्रॅण्डपर्यंत लिप बाम हे सर्वत्र उपलब्ध आहेत. ‘शॉपर्स स्टॉप’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाइन शॉपिंग साइटवर उपलब्ध असलेले लिप बाम खरेदी करायला काहीच हरकत नाही.