scorecardresearch

Premium

फेस्टिव्हलचा ‘जुगाडू’ स्टाइल फंडा

यंदा बहुतेक डिझायनर्सनी घेरदार स्कर्ट्स, घागरा या प्रकाराला थोडा ब्रेक दिलाय.

फेस्टिव्हलचा ‘जुगाडू’ स्टाइल फंडा

सणासुदीला काय घालायचं? हा प्रश्न नेहमीच सतावतो. प्रत्येक सणासाठी नवा ड्रेस, ज्वेलरी असं समीकरण ठेवलं, तर पुढचे दोन महिने शॉपिंगमध्येच जातील. हे टाळायचं असेल तर हवं नावीन्यपूर्ण स्टाइलिंग. नवे ट्रेंड्स, नव्या स्टाइल्ससोबत कपडय़ांचं पेअरिंग केलं तर वेगवेगळे लुक्स मिळतात. अशा लुक्सची प्रेरणा वेगवेगळ्या डिझायनर्सकडून घ्यायला हरकत नाही. ‘जुगाडू स्टाइल’ फॉम्र्युला वापरणार असाल, तर त्यातले ट्रेंड्स माहीत असायला हवेत.

सणासुदीला काय घालायचं? हा प्रश्न नेहमीच सतावतो. गणपती, मग नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी. प्रत्येक सणासाठी नवा ड्रेस, ज्वेलरी असं समीकरण ठेवलं, तर पुढचे दोन महिने शॉपिंगमध्येच जातील. ते ठीक आहे, पण ‘बजेटचं काय?’ त्याचाही विचार करायला हवाच ना. नवे ट्रेंड्स, नव्या स्टाईल्ससोबत कपडय़ांचं पेअरिंग, वेगवेगळे लुक्स याच्या काही वेगळ्या युक्त्या डिझायनर, ब्रँड्स आणत असतातच. मागच्या वर्षी साडी घागरा, स्कर्ट आणि चोली हा मिक्स अँड मॅचचा फंडा चर्चेत होता. यंदा परत ‘जुगाडू स्टाइल’ फॉम्र्युला वापरणार असाल, तर त्यातले ट्रेंड्स माहीत असायला हवेत.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

मागच्या वर्षी स्कर्ट, घागरा, चोली हे बरंच ट्रेण्डमध्ये होतं. नवरात्र, दिवाळीला हा पर्याय उत्तम असतो. यंदा मात्र बहुतेक डिझायनर्सनी घेरदार स्कर्ट्स, घागरा या प्रकाराला थोडा ब्रेक दिलाय. त्याऐवजी लांब कुर्ते, मॅक्सी ड्रेस, एक्स्ट्रा लांब ओढण्या, शर्ट ड्रेस, स्ट्रेट सलवार, जॅकेट्स हे प्रकार फेस्टिव्ह सीझनमध्ये पाहायला मिळतील. सण असले, तरी ऑफिस, कॉलेजला जाणं काही सुटत नाही. त्यामुळे तुमची दिवसभराची धावपळ लक्षात घेऊन कॅज्युअल पण फेस्टिव्ह असा लुक यंदा ट्रेण्डमध्ये असणार आहे आणि गंमत म्हणजे सध्या सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील लुक पुन्हा ट्रेण्डमध्ये येतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईच्या कपाटात डोकवायलासुद्धा हरकत नाही.

गेले कित्येक सीझन कपडय़ांसाठी ‘मिक्स अँड मॅच कलर स्किम’ ट्रेण्डमध्ये होती. आपल्यालासुद्धा कॉन्ट्रास्ट ड्रेसिंग करण्याची सवय आता अंगवळणी झाली आहे. पण यंदा या सवयीला तडा द्यावा लागणार आहे, कारण मॅचिंग ड्रेसिंग लुक चर्चेत असणार आहे. त्यामुळे एकाच रंगाची आणि त्याही पुढे जाऊन एकाच प्रिंटची सलवार आणि कुर्ता घालून कोणी कॉलेजमध्ये दिसलं तर खबरदार, तिला काकूबाई म्हणालात तर.. ती यंदाची फॅशनिस्टा आहे. बरं या ट्रेण्डचा अजून एक फायदा म्हणजे तुम्ही मॅचिंगचा ट्रेण्ड मिरवू शकताच, पण कॉन्ट्रास्ट मॅचिंग करून नवा लुकही तयार करू शकता. थोडक्यात, एका ड्रेसमधून दोन लुक्स सहज होतात. दुसरी गोष्ट म्हणजे यंदा तुमच्याकडे वेगवेगळ्या स्टाइलच्या कुर्त्यांचं कलेक्शन असू द्या. एकतर हे कुर्ते तुम्हाला येत्या काही सीझनपर्यंत सहज साथ देतील आणि दुसरा मुद्दा म्हणजे कितीही झालं तरी शेवटी कुर्ता आहे, त्यामुळे ऑफिस, कॉलेज, पार्टी, गेट टूगेदर सगळीकडे सहज वापरता येतो. त्यामुळे कपाटात पडून राहण्याचा प्रश्न नाही. वेस्टलाइन श्रग, एम्ब्रॉयडरी जॅकेट्सचा जमाना गेला आता. लांब फ्लेअरची जॅकेट्स, एक्स्ट्रा लांब ओढण्या यांचा बोलबाला सुरू झाला आहे. अजूनही लेगिंग्सला चिटकून असला तर मात्र तुमची फॅशन ट्रेन चुकली आहे. कारण लेगिंगच्या पल्याड सलवार, कॉटन पँट, धोती पँट हे हुकमी एक्के बाजारात आले आहेत. यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमच्या वॉडरोबमधल्याच कपडय़ांशी प्रयोग करत नवीन लुक्स कसे आणता येतील याच्या काही खास टिप्स –

१)  कॉटन कुर्ती अशा प्रयोगांसाठी उत्तम असतात. सध्या एका कुर्त्यांवर दुसरा कुर्ता आणि सोबत चुडीदार असा लुक ट्रेण्डमध्ये आहे. ड्रेस शिवताना दोन कॉन्ट्रास्ट कापड निवडा. आतल्या स्लीव्हलेस कुर्त्यांसाठी चेक्स, प्रिंटेड कापड आणि बाहेरच्या कुर्त्यांसाठी प्लेन असं मॅचिंग असू द्या. चुडीदार बाहेरच्या कुर्त्यांच्या मॅचिंगमध्ये ठेवा. बॉक्स स्टाइल कुर्ता यासाठी उत्तम. कारण याचं फिटिंग लूज असतं. त्यामुळे कुर्ता घट्ट बसणार नाही. हा एक लुक होतोच आणि हे दोन्ही कुर्ते तुम्ही वेगवेगळे वापरू शकता त्यामुळे तीन लुक सहज होतात.

२)  लिनन, मलमल कापडाचा एक छान लूझ फिटचा ‘शर्ट ड्रेस’ शिवून घ्या. शक्यतो तो न्यूट्रल रंगात पण छान एम्ब्रॉयडरी केलेला असला तर उत्तम. एरवी बेल्ट लावून तो ऑफिसला वापरता येईलच, पण कोणत्याही कुर्त्यांवर जॅकेट म्हणून पण सहज कॅरी करता येईल.

३) यंदा लांब जॅकेट्स ट्रेण्डमध्ये आहेत. त्यामुळे दोन- तीन वेगवेगळ्या स्टाइलचे जॅकेट कलेक्शनमध्ये असू द्या. अर्थात जॅकेट्सना कधीच मरण नसतं, त्यामुळे ते पडून राहाण्याचा प्रश्न नाही. त्यातही मुंबईसारख्या ठिकाणी हिवाळा नावापुरता असतो. त्यामुळे पॅडिंग देण्याची गरज नाही. कुर्ता, स्कर्ट आणि टॉप, साडी सगळ्यावरच हे जॅकेट वापरता येईल.

४)  कुर्ता शक्यतो न्युट्रल शेडचा असू द्या. त्यावर लेअरिंगने तुम्ही गंमत आणू शकता. अगदी प्लेन कुर्त्यांवर प्रिंटेड सलवार किंवा कॉटन पँटसुद्धा छान दिसते. त्यावर एखादी मस्त ओढणी घ्या. अख्खा लुक एकाच सूटमधला असलाच पाहिजे असं काही नाही. कॉन्ट्रास्ट मॅचिंग भाव खाऊन जातं.

– मृणाल भगत

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Festive style funda

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×