viva-wallहाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

नेटकारांची संख्या मुंबईत सर्वाधिक नि मोबाइलचा इंटरनेट दर घसरणार, अशा आशयाच्या बातम्या सध्या येताहेत. त्यातील तपशील तुम्हाला बातम्या वाचून कळले असतीलच. नेटच्या वापराबद्दल तरुणाईच्या मताचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांना अभ्यास नि प्रोजेक्ट्सच्या माहितीसाठी गुगलचं फास्ट सर्च इंजिन फारच उपयुक्त ठरतं. व्हॉट्सअपचा सहारा चॅटिंगसाठी घेतला जात असला तरी त्याचा अतिरेक टाळावा, असं अनेकांना वाटतंय. बऱ्याच जणांना नेटपॅक व्यवस्थित पुरतंय. काही जण नेटभेटीखेरीज प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देतात. तर काहींचं दुसरं टोक एवढं की ते व्हॉटस्अॅपवरून आई-बाबांशी कनेक्टेड राहतात. नेटचा वापर मुख्यत्वे अभ्यास, माहिती, सोशल नेटवìकग, संवाद, मनोरंजन नि ऑनलाइन व्यवहारांसाठी केला जातोय. नेट बहुतांशी मोबाइलवर वापरलं जातंय. इंटरनेट ही आवश्यक गरज झालेय, हे सगळ्यांना मान्य असलं तरीही त्याचा विचारपूर्वक नि बॅलन्स्ड वापर व्हायला हवा, हे सगळ्यांनी आवर्जून सांगितलंय. कनेक्टेड पीपल हे केवळ व्हच्र्युअल नव्हे प्रत्यक्षात असावं, हेच खरं. इंटरनेट वापराबद्दल आपली मतं काही जणींनी ‘व्हिवा’शी शेअर केली.

रागिणी यादव
25मी पर्सनल कॉम्प्युटर नि सेलफोनवर इंटरनेट वापरते. सेलफोनवर व्हॉटस्अप, हाइक बघते नि फेसबुक ‘पीसी’वर बघते. त्यामुळं मला नेटपॅक व्यवस्थित पुरतो. यूपीएससीच्या अभ्यासासाठी मी जनरल नॉलेज रिलेटेड आणि पॉलिटिक्समधल्या इंटरेस्टमुळं पॉलिटिक्स रिलेटेड साइटस् बघते. इंटरनेटवर मी दिवसभरात अंदाजे ३ ते ६ तास अॅक्टिव्ह असते. फ्रेण्ड्ससोबत स्टडी रिलेटेड टॉपिक्स, नोट्सचे अपडेट घेते. टाइमपास अगदी लिमिटेड असतो. इंटरनेटच्या वापरामुळं वेळ वाचतो हे खरं असलं तरी मी स्वत: पुस्तकांतून रेफरन्स शोधते. त्याचा खूप फायदा होतो. सध्या मोठय़ांपेक्षा लहान मुलं नेटअॅडिक्ट होताना दिसताहेत. डिक्शनरी वापरताना ती फारशी दिसत नाहीत. त्यांची व्होकॅब्लरी कशी वाढणार? मुलांच्या हातात ठरावीक वेळच मोबाइल द्यावा. इंटरनेटचा सकारात्मक पद्धतीनं वापर करायला आपण शिकलं पाहिजे. नेटच्या जाळ्यात न अडकता आपली विचारक्षमता शाबूत ठेवली पाहिजे.

ऋचा सावरगावकर
स्मार्टफोनवरच मी इंटरनेटचा वापर करते. पुढच्या करिअरसाठी मी एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट्सच्या 26साइटस् बघते. नवनवीन कोर्सेची माहिती मिळवते. मी फेसबुक जवळजवळ वापरत नाही. हाइक, ट्विटर वापरत नाही. व्हॉटस्अपवर मी गरजेपुरती अॅक्टिव्ह असते. दिवसभरात अंदाजे चार-साडेचार तास नेटवर अॅक्टिव्ह असते. अभ्यासाचे अपडेट्स व्हॉट्सअपवरून मिळतात. सुरुवातीला मी फारच अॅक्टिव्ह होते. पण मनाशी निश्चय करून हा वेळ कमी केला. इंटरनेट वापरामुळं आपली क्युरिऑसिटी संपत चालल्यासारखी वाटत्येय. विचार करण्याची प्रोसेस कमी होत्येय. आमनेसामने चर्चाच होत नाहीत. त्यामुळं वेगवेगळे मुद्दे मांडले जात नाहीत नि आपण मल्टिपरस्पेटिव्ह होत नाही. वाचन कमी झाल्यानं सखोल अभ्यास करण्याचं प्रमाण कमी होतंय. मला नेटपॅक कायमच पुरतं. बाहेरगावी जाताना मी नेट बंदच ठेवते नि तिथल्या गोष्टींना प्रायोरिटी देते. सुरुवातीला वर्षभर व्हॉटस्अप घेतलंच नव्हतं. ते घेतल्यावर त्याच्या सकारात्मक बाजूंची जाणीव झाली. अनेक मित्र-मत्रिणींशी कॉन्टॅक्ट झाला. मी नेट अॅडिक्ट नसले तरीही मला डिटॅच राहायलाही शिकायचं.

जान्हवी देसाई
इंटरनेटबेस्ड जॉबमुळं मी कायमच ऑनलाइन असते. सेलफोन, लॅपटॉप, डेस्कटॉपचा वापर मी करते. 27कामाच्या संदर्भात मी काही ठरावीक साइट नि ठरावीक अॅप वापरते. दिवसभरात कामाचे तास धरून अंदाजे १८ तास अॅक्टिव्ह असते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अप, व्हायबर मी वापरते. कामासाठी अनलिमिटेड नेटपॅक घेते. घर-ऑफिसमधलं वायफायही वापरलं जातं. सìचगसाठी गुगल हे सगळ्यात बेस्ट टूल आहे. इंटरनेटच्या सतत वापरामुळं चटकन ‘गुगलणं’ ही सवयच झाल्येय. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर सेकंदांत मिळालं तरी आपली विचारशक्ती कमी होतेय. हा जॉब मिळायच्या आधी मी हिमाचलला फिरायला गेले होते. तो माझ्या लाइफमधला बेस्ट टाइम होता. तिथं नेट कनेक्टिव्हिटीच नसल्यानं अपडेट्स मिळत नव्हते. आपसूकच मन:शांती मिळली होती. आपण सगळ्यांनीच इंटरनेट वापरताना बॅलन्स साधणं गरजेचं आहे.

मधुरा सावंत
मी ‘पीपीटी प्रेझेंटेशन्स’साठी-अभ्यासासाठी नेट वापरते. आमचा ट्रॅव्हिलगचा बिझनेस असल्यानं तिकीट 30बुकिंगसाठी नि सोशल राहण्यासाठी इंटरनेट वापरते. व्हॉटस्अॅप नि फेसबुकचा उपयोग सोशली अॅक्टिव्ह राहण्यासाठी नि फ्रेण्ड्सचे अपडेट मिळण्यासाठी होतो. रिसर्चची खूप आवड असल्यानं मी त्यासंबंधीच्या साइटस् सर्च करते. मी यूटय़ूबच्या साहाय्यानं गिटार वाजवायला शिकतेय. जापनीज शिकण्यासाठीचा क्लास वेळेअभावी बंद करावा लागला होता. त्यामुळं गुगल ट्रान्सलेटरवरून जपानी शिकतेय. मला मोबाइलचं नेटपॅक पुरतं. अभ्यासासाठी सìचग, तिकीट बुकिंग लॅपटॉपवर वायफायवरून करते. दिवसभरात अंदाजे २-३ तास नेटवर अॅक्टिव्ह असते. मी अनेक साइटस् शोधून शक्य तेवढी अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते.

रुची कुलकर्णी
स्मार्टफोनवरून इंटरनेट वापरणं सोईचं असलं तरी मी घरी लॅपटॉपही वापरते. डिपार्टमेंटच्या 28सायकॉलॉजीच्या महत्त्वाच्या ईमेल्स चेक करण्यासाठी जीमेल वापरते. व्हॉट्सअपवर सब्जेक्टवाइज ग्रुप डिस्कशन चालतं. परदेशी नातलगांशी संवाद साधण्यासाठी व्हायबर नि स्काइपचा सहारा घेते. फेसबुकवरून आमच्या डान्स शोजची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवता येते. कथक नि इतर डान्सचे व्हिडीओज यूटय़ूूबच्या साहाय्यानं पाहते. दिवसभरात मी अंदाजे दोन तास नेटवर अॅक्टिव्ह असते. घरी वायफाय असल्यानं नेटपॅक पुरतं. मी स्वत: इंटरनेटचा मर्यादित वापर करत असले तरी माझ्या परिचितांपकी काही जण सतत ऑनलाइन असतात. त्यांच्याशी लगेच संवाद साधता येत असला तरीही प्रत्यक्ष संवाद साधणंही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. नेटवरच्या भेटींमुळं कधी कधी प्रत्यक्ष भेटल्यावर काय बोलावं, हा प्रश्न पडतो. पण आमचा ग्रुप भेटायचं असलं की भेटूनच बोलायचं ठरवतो.

केतकी कदम
मी मोबाइलवरून इंटरनेट अॅक्सेस करते. सेल्फ प्रमोटिंग, जुन्या फ्रेण्डशी कनेक्टेड राहणं, अभ्यास नि 29नाटकाच्या ग्रुपशी कनेक्ट राहण्यासाठी मी अॅप्स नि साइटस् वापरते. व्हॉटस्अप वापरताना कॉलपेक्षा टेक्स्टिंग करणं बरं पडतं. १७ ग्रुप्सवर मी अॅक्टिव्ह आहे. मी फेसबुक, हाइक वापरते. दिवसभरात अंदाजे मी दोन ते तीन तास अॅक्टिव्ह असते. अभ्यास नि तालमींमुळं फार वाचा-बघायला वेळ मिळत नाही. नेटपॅक व्यवस्थित पुरतं. माझं फ्रेण्डसर्कल कॉल्सपेक्षा नेटचाच वापर जास्त करतं. इंटरनेटचा वापर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी त्याची सकारात्मक बाजू पाहते. मी नेट अॅडिक्टेड नाही. नेटपॅक रिचार्ज करायचं राहिलं तर मी हायपर होत नाही. काहींना मात्र इंटरनेटची सवय लागतेय, त्यांनी वेळीच स्वत:ला सावरायला हवं.