स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती पुण्यामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ तर्फे(एनएसयूआय) कोथरूडमधील परमहंसनगर येथे विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अ‍ॅड. राहुल म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. ‘भाजपच्या व्यापारी आघडी’ तर्फे महर्षिनगर येथील आभ्यासिकेमध्ये विवेकानंदांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खाऊ देण्यात आला. ‘पतित पावन संघटने’ तर्फे जयंतीनिमित्त मॉडर्न महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘अक्षय ब्लड बँक’ तर्फे रक्ताचे संकलन करण्यात आले. ‘रिपब्लिकन ग्राहक परिषदे’ तर्फे सातारा रस्त्यावरील विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  जयंतीनिमित्त ‘ग्राहक पेठे’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुणे विद्यार्थी गृहाच्या एन.सी.सी. कॅडेट्सनी मानवंदना दिली. आहिल्यादेवी हायस्कूल आणि नू.म.वि. प्रशालेच्या घोषपथकातील विद्यार्थिनींनी घोषाच्या गजरात मानवंदना दिली.