येथील ज्योती सहकारी पतसंस्थेने सन २०१२-१३ या वर्षांत ८३ कोटी रुपयांच्या विक्रमी ठेवी गोळा केल्या असून गतवर्षांपेक्षा यावर्षी २४ कोटींची वाढ झाली असल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रवींद्र बोरावके यांनी दिली.
दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व मंदीची लाट असताना या पतसंस्थेने सन २०१२-१३ या वर्षांत ८३ कोटी रुपयांच्या ठेवी मिळवून ५८ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. यावर्षी ठेवीत सुमारे २४ कोटी व कर्जात १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापैकी स्वनिधी ५ कोटी, गुंतवणूक २३ कोटी ९७ लाख रुपयाची करण्यात आली असून संस्थेने सलग ४ वर्षांपासून लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग कायम राखला आहे. तर संस्थेने कर्जाची थकबाकीचे प्रमाण ४.५३ टक्के तर एनपीए १.६६ टक्क्य़ापर्यंत राखण्यात यश मिळविले असल्याची माहिती व्यवस्थापक दिलीप रांधवणे यांनी दिली.