जळगाव कुस्ती केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या कुमार केसरी स्पध्रेत कराड तालुक्यातील शेणोली गावचा सुपूत्र आकाश अर्जुन महाजन याने ‘कुमार केसरी २०१३’ चा किताब पटकावला. आकाशने मुंबईच्या सत्यजीत यादववर मात करत स्पर्धा जिंकली. गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
आकाशच्या घरची परिस्थिती हालाखीची असून, गावातील तालमीतच तो सराव करत आहे. त्याला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व गावातील प्रदीप पाटील, प्रल्हाद कापूरकर, प्रमोद कणसे, अमोल पाटील, प्रशांत पाटील यांच्याकडून प्रेरणा व प्रसंगी आíथक सहकार्य मिळत आहे. त्याने राज्यपातळीवर नाव कमाविण्याच्या हेतून गेल्या महिन्यात कुमार केसरी कुस्ती स्पध्रेसाठी सहभाग नोंदविला. तालूका, जिल्हास्तरावरील निवड चाचणीत त्याला यश मिळाले. स्पध्रेसाठी जळगाव येथे नुकताच अंतिम सामाना झाला. त्यामध्ये आकाशने मुंबईच्या सत्यजीत यादववर अंतिम लढतीत मात करत स्पर्धा जिंकली.