News Flash

६५ हजारांचा ऐवज लांबवला

जेवणाचे बिल उधार ठेवले नाही म्हणून हॉटेलची तोडफोड करीत वेटरला मारहाण केल्याची घटना रात्री घडली. हल्लेखोरांनी ६५ हजार रुपये व मोबाइलही लंपास केला. बेलापूर रस्त्यावरील

| November 6, 2013 01:49 am

जेवणाचे बिल उधार ठेवले नाही म्हणून हॉटेलची तोडफोड करीत वेटरला मारहाण केल्याची घटना रात्री घडली. हल्लेखोरांनी ६५ हजार रुपये व मोबाइलही लंपास केला. बेलापूर रस्त्यावरील हॉटेल नटराजमध्ये हा प्रकार घडला.
हॉटेलचालक राजन केवल खुराणा (वय २८) यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एका तरुणाचे जेवणाचे बिल उधार ठेवण्यास खुराणा यांनी नकार दिला. त्यानंतर तो तरुण बिलाचे पैसे देऊन निघून गेला.
त्याने रात्री साडेअकरा वाजता माजिद शेख व रवि जठार यांच्यासह इतर चार अनोळखी तरुणांनी येऊन बिल उधार का ठेवले नाही असे म्हणत हॉटेलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. लोखंडी पाइप आणि दांडय़ाने त्यांनी टीव्ही व काऊंटरसह इतर सामान फोडले. तोडफोड करीत असताना त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. त्यात सुजित खुराडे व एकनाथ चव्हाण हे दोघे जखमी झाले. हल्लेखोर तरुणांनी काऊंटरमधील ६५ हजार रुपये व ब्लॅक बेरी मोबाइल लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 1:49 am

Web Title: assets of 65 thousand stolen
टॅग : Stolen
Next Stories
1 नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग
2 मुलाखतीनंतर भाजपच्या इच्छुकांमध्ये खदखद
3 जि. प. कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा