24 September 2020

News Flash

फग्र्युसनच्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला,तरुणास अटक

फग्र्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्याच प्रवेशद्वाराजवळ एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. सोमवारी सायंकाळी झालेला हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची शक्यता

| December 12, 2012 01:28 am

फग्र्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्याच प्रवेशद्वाराजवळ एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. सोमवारी सायंकाळी झालेला हा  प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची शक्यता आहे. हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला १५ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनमोल अतुल जाधवराव (वय २३, रा. कोथरूड डेपो) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. फग्र्युसनमध्ये शिकणारी एका माजी नगरसेवकाची मुलगी सायंकाळी तास संपवून बाहेर पडत असताना महाविद्यालयाच्या प्रदेशद्वाराजवळ एक तरूण मोटारीतून आला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तशीच पुढे जाऊ लागली. त्यावर तरुणाने तिच्या खांद्यावर कोयत्याने वार केले व पळून गेला. या मुलीसोबत मैत्रीण होती. त्या दोघी नंतर रुग्णालयात गेल्या. तिच्यावर उपचार करून तिला लगेच सोडण्यात आले. डेक्कन पोलिसांनी मंगळवारी पहाटे अनमोलला घरातून अटक केली. त्याच्या वडिलांचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:28 am

Web Title: attack on girl student of fargusen college for one side love
Next Stories
1 पुणेकर उद्या पाण्याशिवाय
2 विकास नियंत्रण नियमावली मराठीतही उपलब्ध होणार
3 पीएमपीच्या ४६० कोटींचे लेखापरीक्षणच नाही
Just Now!
X