श्रीगोंदे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब नहाटा यांच्याविरुद्ध आदिवसी महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन म्हणून गुन्हा श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वडाळी येथे राहणा-या या अत्याचारित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तिने दादा कोकरे या व्यक्तीस उसने दिलेले पैसे परत मागितले असता, कोकरे आपल्याला लोणी व्यंकनाथ येथे बोलवले. तेथे आल्यावर त्यांनी नहाटा यांच्या फार्म हाउसवर बोलवले, फार्म हाऊसवर आपण गेलो असता नहाटा व कोकरे यांनी शिवीगाळ व मारहाण केली तसेच अत्याचार केले. नंतर आपले हात, पाय व तोंड बांधून हडपसर (पुणे) येथे सोडले.
आपली राजकीय बदनामी करण्याच्या हेतूने खोटी फिर्याद दिली गेली आहे. यापूर्वीही विरोधकांनी माझ्यावर असे खोटे आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया नाहटा यांनी व्यक्त केली.