गणिताच्या बागुलबुवावर भावे प्रशालेमध्ये उत्तर मिळणार आहे. राष्ट्रीय गणित वर्ष आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त भावे प्रशालेमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये साधारण शंभरहून अधिक मॉडेल्स आणि तक्ते सादर करण्यात आले आहेत. बहुतेकोंना कठीण वाटणारा गणित विषय या प्रदर्शनामध्ये सोपा करून मांडण्यात आला आहे. कोडी, आकडय़ांशी खेळ, किचकट वाटणाऱ्या प्रमेयांची सोपी मांडणी अशा विविध माध्यमातून गणिताची मांडणी करण्यात आली आहे. विज्ञानभारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्रशालेने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते शुक्रवारी (७ डिसेंबर) करण्यात आले असून ९ डिसेंबपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या शिवाय गणितासंबंधी विविध विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गणिती कोडी सोडवण्याची ‘गणित रंजन’ ही स्पर्धाही घेण्यात येणार आहे.    

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान