जिल्ह्यातील सटाण्यासारख्या ग्रामीण भागातील केवळ सात वर्षांच्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र शासनाचा संगणकविषयक माहिती तंत्रज्ञान (एमएस सीआयटी) अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. सटाणा येथील हर्षवर्धन राहुल सोनवणे याने हे यश मिळविले आहे. इतक्या लहान वयात ही परीक्षा विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होणे ही आश्चर्याची गोष्ट मानली जात आहे. हर्षवर्धनने सटाणा येथील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमधून नुकतीच इयत्ता पहिलीची परीक्षा दिली असून त्यातही त्याने अव्वल श्रेणी मिळविली आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्याने संगणक हाताळण्यात प्रावीण्य मिळविले. त्याच्या या यशामागे आई सारिका सोनवणे यांचे मार्गदर्शन कारणीभूत आहेत.